River Linking Project : विधानसभेपूर्वी एकदरे-वाघाड नदीजोड प्रकल्पास मान्यता शक्य

Nashik News : नाशिक जिल्ह्यापेक्षा मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या दमणगंगा (एकदरे)- गोदावरी (वाघाड) या नदीजोड योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर झाला आहे.
River Linking Project (file photo)
River Linking Project (file photo)esakal

Nashik News : नाशिक जिल्ह्यापेक्षा मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या दमणगंगा (एकदरे)- गोदावरी (वाघाड) या नदीजोड योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत दोन हजार ७५३ कोटी इतकी असून, प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठविल्यावर राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. (river linking project)

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. एकदरे-वाघाड नदीजोड प्रकल्पामुळे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले जाऊन मराठवाड्यातील १३ हजार हेक्टर सिंचन वाढण्यास मदत होणार आहे. पेठ तालुक्यातील दमणगंगा- एकदरे- गंगापूर धरण हा नदीजोड प्रकल्प माजी खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी प्रस्तावित केला होता.

या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने २०१८ मध्ये निधीही मंजूर केला. त्यानुसार या नदीजोडसाठी तीन हजार ५५० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध असल्याचे निश्चित करण्यात आले. त्या दाखल्यानंतर या नदीजोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय जलविकास अभिकरणकडे देण्यात आले होते.

त्याचवेळी हा नदीजोड प्रकल्प एकदरे-गंगापूर असा करण्याऐवजी एकदरे-वाघाड करण्यात आला. यासाठी पेठ तालुक्यातील एकदरे येथे एक हजार १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधले जाणार असून, ते पाणी बंदिस्त पाइपलाईनद्वारे दिंडोरी तालुक्यातील झार्ली येथील प्रवाही वळण योजनेत सोडले जाईल. तेथून ते वाघाड धरणात सोडले जाणार आहे. वाघाड धरणातून ते पाणी गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात सोडले जाईल. (latest marathi news)

River Linking Project (file photo)
Nashik News : सुरक्षिततेसाठी भविष्यात ‘माध्यम’ शिक्षण गरजेचे; वादविवादात अनेकांची भाषा घसरत असल्याने जाणकारांचे मत

या धरणातून १५० दशलक्ष घनफूट पाणी पेठ तालुक्यातील धरणालगतच्या परिसरात सिंचनासाठी राखीव ठेवण्यात येणार असून, उर्वरित तीन हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी वाघाड धरणातून गोदावरीच्या माध्यमातून जायकवाडी धरणात सोडले जाणार आहे. यामुळे मराठवाड्यात १३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र वाढेल.

यंदा जानेवारीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यावर राष्ट्रीय जलविकास अभिकरणने ४ एप्रिल २०२४ ला तो राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सोपविला. गेल्या महिन्यात या प्रकल्पाचे राज्यस्तरीय तांत्रिक समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. या समितीने त्यात काही बदल सुचविले असून, ते बदल केल्यावर पुन्हा एकदा सादरीकरण होऊन त्याला तांत्रिक मान्यता मिळून तो प्रकल्प राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे पाठविला जाईल. त्यानंतर राज्य सरकार या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देईल.

असे उचलणार पाणी

दमणगंगा (एकदरे)- गोदावरी (वाघाड) नदीजोड प्रकल्पासाठी पश्चिम वाहिनी दमणगंगा नदीवर एक हजार १५० दशलक्ष घनफूट क्षमतेचे एकदरे धरण प्रस्तावित आहे. एकदरे धरणातील उपलब्ध होणारे तीन हजार ५५० दशलक्ष घनफूट पाणी तीन टप्प्यांत उपसा पद्धतीने उचलून त्यातील तीन हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी दिंडोरी तालुक्यातील झार्लीपाडा प्रवाही वळण योजनेत सोडले जाईल.

River Linking Project (file photo)
Nashik ZP News : ग्रामसेवक युनियन असहकार आंदोलनावर ठाम; आंदोलनाबाबत संघटनांमध्ये फूट

तेथून ते पाणी प्रवाही पद्धतीने वाघाड धरणात जाईल. त्यापुढे वाघाड धरणातून त्याचा विसर्ग करून मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात प्रवाही पद्धतीने सोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे मराठवाड्यात १३ हजार १६४ हेक्टर सिंचनक्षेत्र निर्मिती होईल.

प्रकल्पाची किंमत दोन हजार ७५३ कोटी रुपये

एकदरा- वाघाड नदीजोड प्रकल्प उभारण्याची किंमत एक हजार ९१० कोटी रुपये असून, उपसा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्या प्रकल्पाचा खर्च मिळून या प्रकल्पाची किंमत दोन हजार ३६३ कोटी रुपये होते. त्यात जीएसटी व इतर बाबींचा समावेश करून या प्रकल्पाची एकूण किंमत दोन हजार ७५३ कोटी रुपये होते.

पाच वर्षांत होणार प्रकल्प

या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर प्रकल्पाची त्यानंतर पाच वर्षांत उभारणी होऊ शकते, असे नियोजन आहे. हा पूर्ण प्रकल्प वनजमिनीवर उभारला जाणार असल्याने त्यासाठी खासगी जमिनीच्या भूसंपादनाची गरज नसल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकेल.

River Linking Project (file photo)
Nashik News : साडेचार लाख बालकांना झिंक गोळ्यांचे होणार वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com