Nashik Onion News : मुंगसेत 25 हजार क्विंटल कांद्याची आवक; सकाळच्या सत्रात भावात घसरण, दुपारनंतर सुधारणा

Nashik News : बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात सलग दुसऱ्या दिवशी २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. कांद्याला सर्वाधिक २ हजार १३० रुपये भाव मिळाला.
Onion
Onion esakal

मालेगाव : येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात सलग दुसऱ्या दिवशी २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. कांद्याला सर्वाधिक २ हजार १३० रुपये भाव मिळाला. कालच्या तुलनेने सर्व्वोच्च भावात ४० रुपये घट झाली. सायंकाळी सहापर्यंत सातशे वाहनातील कांद्याचे लिलाव झाले होते. यातील शंभरपेक्षा अधिक वाहनातील कांद्याला दोन हजारावर भाव मिळाला. (Arrival of 25 thousand quintals of onion in Mungase)

सरासरी बाजारभाव १४०० ते १५०० रुपये दरम्यान होता. विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याने ट्रॅक्टर, पिकअप या वाहनांबरोबरच कांदा भरणाऱ्या मजुरांना रोजगार मिळाला आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी सरसकट मागे घेतल्यानंतर मुंगसे बाजारात सोमवारी ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक होती.

जवळपास १४०० वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारात जम्बो आवक होती. जवळपास १३०० वाहनातून २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता. सकाळच्या सत्रात ६५० वाहनांचा लिलाव करण्यात आला. भाव कमीत कमी ५०० तर जास्ती जास्त २ हजार १३० रुपये प्रतिक्विंटल होता. (latest marathi news)

Onion
Nashik Parking Problem : ‘नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग; कोंडीची समस्या जैसे थे

चांगल्या प्रतीच्या शंभरपेक्षा अधिक वाहनातील कांद्याला दोन हजारावर भाव मिळाला. बहुतांशी कांदा १४०० ते १७०० रुपये दरम्यान विकला गेला. मंगळवारी पारा ४३.६ अंशावर होता. कडक उन्हामुळे दुपारी लिलावाचे काम बंद होते. सायंकाळच्या सत्रात जवळपास सहाशेपेक्षा अधिक वाहनांतील कांद्याचा लिलाव झाला.

सायंकाळी उशिरापर्यंत लिलावाचे कामकाज सुरु होते. बाजार सुरु झाल्याने शेतमजुरांसह ट्रॅक्टर, पिकअपचालकांना रोजगार मिळाला आहे. उपबाजार परिसरातील चहा टपरी, रसवंतीगृह, पान दुकान, हॉटेल, उपगृह चालक आदींना दिलासा मिळाला आहे.

Onion
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com