Nashik News : सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे गुन्हेशाखेचा अतिरिक्त पदभार

Nashik : गुन्हे विभागाचा अतिरिक्त पदभार विशेष शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Retired Assistant Commissioner Dr. Assistant Commissioner Sandeep Mitke taking charge of City Crime Branch from Sitaram Kolhe.
Retired Assistant Commissioner Dr. Assistant Commissioner Sandeep Mitke taking charge of City Crime Branch from Sitaram Kolhe.esakal

Nashik News : पोलिस आयुक्तालयाच्या शहर गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे सेवानिवृत्त झाले असून, गुन्हे विभागाचा अतिरिक्त पदभार विशेष शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यासंदर्भात आदेश दिले. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयातील दोन सहायक आयुक्तपदे रिक्त असून, दोघांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. ( Assistant Commissioner Sandeep Mitke has additional charge of Crime Branch )

नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार दीड वर्षापासून डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडे होता. शहर व ग्रामीण पोलिस दलासह राज्य गुन्हे अन्वेषण विभागात कर्तव्य बजाविल्यानंतर ३१ मे रोजी डॉ. कोल्हे पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये शहर गुन्हेशाखेचा अतिरिक्त पदभार संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (latest marathi news)

Retired Assistant Commissioner Dr. Assistant Commissioner Sandeep Mitke taking charge of City Crime Branch from Sitaram Kolhe.
Nashik News : पावसाळापूर्व कामे रखडल्याने नागरिक वेठीस; उंच, सखल भागातील ड्रेनेज, नालेसफाई बाकी

दोन महिन्यांपूर्वीच शहर आयुक्तालयात आलेले सहायक आयुक्त मिटके यांच्याकडे सध्या विशेष शाखेचा पदभार आहे. दरम्यान, शहर आयुक्तालयात वाहतूक व गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त हे पद सध्या रिक्त आहे. वाहतूक व आस्थापना विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांच्याकडे तर गुन्हे व विशेष शाखेचीही जबाबदारी सहायक आयुक्त मिटके यांच्याकडे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहित शिथिल होताच, रिक्त पदावर नवीन सहायक आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Retired Assistant Commissioner Dr. Assistant Commissioner Sandeep Mitke taking charge of City Crime Branch from Sitaram Kolhe.
Nashik News : ‘बटाट्या’ने बिघडविले गृहिणी, सर्वसामान्यांचे बजेट; किरकोळ बाजारात 20 रुपयांवरून 35 ते 40 चा भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com