नाशिक: जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सातत्याने बैठका घेत जनजागृती केली जाते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नाशिक परिक्षेत्रात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या सहा महिन्यांत नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत २९५ जातीय अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले असून, ते गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ ने कमी आहेत.