Nashik Onion Auction : मालेगाव बाजार समितीच्या आवारावर लिलाव पूर्ववत; मुंगसे आवारावर उद्यापासून सुरवात

Onion Auction : लेव्हीच्या वादामुळे व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये निर्णय होत नसल्याने अनेक दिवसांपासून बाजार बंद होता.
Nashik Onion Auction
Nashik Onion Auction esakal

Nashik Onion Auction : लेव्हीच्या वादामुळे व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये निर्णय होत नसल्याने अनेक दिवसांपासून बाजार बंद होता. हमाली, मापाई व वाराई कपात न करता लिलाव करण्यास व्यापारी तयार झाल्याने येथील समितीच्या मुख्य आवारातील तसेच झोडगे व सौंदाणे येथील लिलाव पूर्ववत सुरु झाले. मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील लिलावाचे कामकाज गुरुवारपासून (ता.२) सुरू होणार आहे. बाजार सुरु झाल्याने कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. (auction at onion buying and selling centre in Mungse will start from Thursday )

पुन्हा बाजार बंद होणार नाहीत यासाठी शासन, लोकप्रतिनिधी व बाजार समितीने दक्ष रहावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. व्यापारी व माथाडी कामगारांच्या वादामुळे महिन्यापासून बाजार बंद आहेत. मध्यंतरीच्या काळात समितीने बाजार सुरु करण्यात यश मिळविले होते. २१ एप्रिलला बाजार सुरू होऊन सर्व मालांचे लिलाव झाले.

२२ एप्रिलला व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाल्याने बाजार बंद करण्यात आला. ही कोंडी फोडण्यासाठी समितीचे उपसभापती विनोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी व माथाडी कामगारांची बैठक झाली. व्यापाऱ्यांनी हमाली, मापाई व वाराई कपात न करता लिलाव करण्याची भूमिका घेतली. शेतकरी अडचणीत आले आहेत. (Latest Marathi News)

Nashik Onion Auction
Nashik Onion Auction : लिलाव बंदच्या आडून खासगी बाजार समित्यांना बळ; व्यापाऱ्यांची भूमिका संशयास्पद

लिलाव पुर्ववत सुरु करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती श्री. चव्हाण यांनी केली. यावर माथाडी कामगारांनी पुढचा निर्णय होईपर्यंत आम्ही कामकाजात भाग घेणार नाहीत. मात्र कामावर असल्याची स्वाक्षरी हजेरी पुस्तकात घ्यावी अशी अट ठेवण्यात आली. उपसभापती चव्हाण यांच्यासह संचालकांनी ती मान्य केल्याने बाजार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला.

येथील मुख्य बाजार आवारात १३० क्विंटल मका, ६२ क्विंटल गहू, २३ क्विंटल बाजरी, २२ क्विंटल ज्वारी, ७ क्विंटल तूर, ५ क्विंटल शेंगा, दोन क्विंटल तीळ, एक क्विंटल रिठा, ५ क्विंटल चना तर ४ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. झोडगे उपबाजारात ७०० क्विंटल कांद्याची आवक होती.

भाव कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त १५०० रुपये होते. सरासरी बाजारभाव ११०० रुपये होता. सौंदाणे उपबाजारात १२५ क्विंटल कांद्याची आवक होती. भाव कमीत कमी ५५, जास्तीत जास्त १५२० तर सरासरी बाजार भाव १ हजार ५० रुपये होता. कांद्याचे मुख्य आगार असलेल्या मुंगसे उपबाजार गुरुवारपासून (ता. २) सुरु होणार आहे.

Nashik Onion Auction
Nashik Onion Auction: महिन्यात 3 लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प! निर्यातीसोबत कांदा लिलाव बंद ठरले दुष्काळात तेरावा महिना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com