Nashik News : येवला सिंचन प्रकल्पाभोवती फिरते आश्‍वासनांचे ‘पाणी’!

Nashik : ब्रिटिशकालीन दुष्काळ अन् टंचाईग्रस्त असलेल्या येवला तालुक्यात पर्वतरांगा, डोंगरदऱ्यात सिंचनाचे प्रकल्प होतील अशा अनेक जागा आहेत.
Irrigation Project
Irrigation Project esakal

येवला : ब्रिटिशकालीन दुष्काळ अन् टंचाईग्रस्त असलेल्या येवला तालुक्यात पर्वतरांगा, डोंगरदऱ्यात सिंचनाचे प्रकल्प होतील अशा अनेक जागा आहेत. यावर छोटे-मोठे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत परंतु वर्षानुवर्ष या प्रकल्पांचे भांडवल होऊन मते मिळविण्यासाठीच त्याचा उपयोग होत आहे. यंदाही लोकसभेच्या निवडणुकीत हेच चित्र दिसणार असून तिसरी व चौथी पिढी हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत केवळ आश्वासनावर समाधान मानत आहेत. (Nashik Awaiting completion of irrigation project in Yeola taluka)

येवला आणि पाणीटंचाई हे जणू समानार्थी शब्द आहेत. शेती,सिंचनाच्या सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गहण आहे.अल्प पावसामुळे दरवर्षी जानेवारीपासूनच टंचाईचा सामना करावा लागतो. यावर पर्याय म्हणून अनेक प्रकल्प शक्य आहेत परंतु स्वातंत्र्यानंतर पालखेड डावा कालवा वगळता एकही ठोस उपाययोजना होऊ शकली नाही ही शोकांतिका आहे.

तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी देणाऱ्या, मदत होऊ शकणाऱ्या मांजरपाडा - १ प्रकल्पाचे पाणी पूर्णक्षमतेने कालव्याद्वारे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचण्याची दहा वर्षांपासून प्रतीक्षा आहे. पुणेगाव - दरसवाडी- डोंगरगाव कालव्याची तर १९७२ पासून प्रतीक्षा असून तिसरी पिढी वाट पाहत आहेत. सध्या कालव्याचे अस्तरीकरण सुरू आहे.

मात्र डोंगरगावाला पाणी येईल अन् सिंचनाला पाणी मिळेल तो स्वप्नपूर्तीचा दिवस ठरेल. या कालव्याला फक्त ओव्हेरफ्लोच्या पाण्याची तरतूद आहे, यातही बदल होऊन पाणी आवर्तन ठरणे गरजेचे आहे. स्थानिक साठवण तलाव योजना,पालखेड कालवा अस्तरीकरण आणि पालखेडवरील पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजना बंद पाईपमधून राबविण्याची गरज आहे.

वितरिका क्रमांक ४६ ते ५२ आठमाही करण्याचे आश्वासनाचे केवळ दिवास्वप्न ठरले आहे. पालखेड कालव्यांची वहन क्षमता वाढविणे गरजेचे आहे.१५ टक्के पिण्याच्या पाण्यासाठी सिंचनाच्या पाण्याचा बळी दिला जातो. गेली अनेक वर्षे प्रस्तावित असलेल्या ममदापूर येथील मेळाचा साठवण तलावा मंजुरीच्या प्रकियेत अडकला आहे. (latest marathi news)

Irrigation Project
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजे?

देवदरी येथील देवनाचा प्रकल्पाच्या १२ कोटी रुपयांचा मान्यत्येचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. प्रत्येक निवडणूकीत उमेदवार,आजी-माजी लोकप्रतिनिधी पोकळ आश्वासने देतात, वचननाम्यात हे प्रकल्प येतात मात्र निवडून आल्यावर विषय मागे पडतो.अशी स्थिती तालुक्यातील जनतेच्या नशीबात आहे.

● वर्षानुवर्षे रखडले सिंचन प्रकल्प..

अर्ध्या तालुक्याला जलसंजीवनी देणारा मांजरपाडा प्रकल्प

पुणेगाव - दरसवाडी- डोंगरगाव कालव्याची रखडलेले १५-२० टक्के काम

देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्प (क्षमता - ६५ दशलक्ष घनफुट)

ममदापुरचा मेळाचा साठवण तलाव (क्षमता - ३५ दशलक्ष घनफुट)

राजापुर वडपाटी व खैराबाई साठवण तलाव (क्षमता - १५ दशलक्ष घनफुट)

जायदरे येथील पांडवकार साठवण तलाव (क्षमता - २५ दशलक्ष घनफुट)

पालखेड कालवा व डोंगरगाव कालवा एकमेकांना जोडून मांजरपाड्याचे पाणी दोन्ही कालव्यातून सिंचनाला देणे

पालखेड कालव्याचे अस्तरीकरण

पालखेड वरील पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजना बंद पाईप मधून राबविणे

पालखेडच्या वितरीका ४६ ते ५२ किमान आठमाही करणे

पालखेड लाभक्षेत्रातील १२८ व्या किमी पर्यंत आणि ५२ व्या वितरिकेपर्यंत प्रत्येक आवर्तनाने समन्यायी पाणी वाटप करणे.

Irrigation Project
Nashik Success Story : शेतकऱ्याचा मुलगा बनला विस्तार अधिकारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com