Nashik: बागलाणच्या केंद्रप्रमुखांची धुरा भुमिपुत्रांच्याच खांद्यावर! रिक्त पदांवर 9 वर्षानंतर नियुक्ती; कामाचा ताण होणार हलका

Nashik News : बागलाण तालुक्यात जिल्हा परिषद शाळांना एकच केंद्रप्रमुख कार्यरत असल्याने कामाचा ताण वाढत होता.
ZP school Students
ZP school Studentsesakal

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यात जिल्हा परिषद शाळांना एकच केंद्रप्रमुख कार्यरत असल्याने कामाचा ताण वाढत होता. आता नव्याने ९ केंद्रप्रमुख पदांवर तालुक्यातीलच भुमिपुत्रांची नियुक्ती झाल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे. (Nashik Baglan ZP school head of center Appointment marathi news)

तालुक्याचा विस्तार मोठा असून, गुजरात राज्यालगत व धुळे सरहद्दीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. २९८ शाळा व २१ केंद्रांना २१ केंद्रप्रमुख होते. मात्र, टप्प्याटप्प्याने २० केंद्रप्रमुख निवृत्त झाल्याने एकाच केंद्रप्रमुखावर तालुक्याची धुरा होती. २० केंद्रातील कार्यभार सांभाळण्यासाठी पदवीधर शिक्षक व अन्य शिक्षकांना शाळा, वर्ग सांभाळून अतिरिक्त कार्यभार पाहावा लागत होता.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवतेवरही परिणाम होत होता. गुणवत्ता वाढीसाठी शासनाने ही पदे निर्माण केली होती. मात्र, रिक्त पदांमुळे गुणवत्तेवर परिणाम होत होता. केंद्रप्रमुखांची पदे भरण्याची मागणी अनेक संघटनांकडून केली जात होती. अखेर नऊ वर्षानंतर केंद्रप्रमुखांची पदे भरण्यात आली. (Latest Marathi News)

ZP school Students
Success Story : माधवगिरी मागणाऱ्या कुटुंबातील तरुण PSI! राजापूर येथील जनार्धन बैरागीचे देदीप्यमान यश

नवीन केंद्रप्रमुख

गोविंद देवरे (लखमापूर), विलास पवार (अजमीर सौंदाणे), राजेंद्र भामरे (उत्राणे), अरुण वाघ (नामपूर), प्रभाकर पाटील (चिराई), विजय पगारे (सटाणा), सुभाष शिवदे (कंधाणे), राहुल कापुरे (मुल्हेर), निर्मला भदाणे (मुंजवाड).

"जिल्ह्यात अनेक केंद्रप्रमुख निवृत्त झाल्यामुळे खूपच कमी संख्या होती. त्यामुळे अन्य शिक्षकांना पदभार सांभाळावा लागत होता. नऊ वर्षानंतर पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीमधून केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्यात आली. केंद्रप्रमुख पद भरण्यात आल्याने कामाचा ताण कमी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीस मदत होणार आहे."- हिरालाल बधान, केंद्रप्रमुख, बागलाण

ZP school Students
Nashik News : लासलगाव उपजिल्हा रुग्णालय इमारतीला प्रशासकीय मान्यता! मंत्री भुजबळ यांचे प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com