Nashik Bharat Jodo Nyay Yatra : सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; जयराम रमेश यांची ग्वाही

Political News : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिकला रवाना होण्यापूर्वी जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकार परिषद घेत संवाद साधला
Congress Politicians press conference at chandwad
Congress Politicians press conference at chandwadesakal

ओझर परिसर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीला प्रतिउत्तर म्हणून काँगेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी पाच गॅरंटी जाहीर केल्या असून केंद्रात सतेत्त आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी येथे केली. (Bharat Jodo Nyay Yatra) भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिकला रवाना होण्यापूर्वी जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकार परिषद घेत संवाद साधला. (Nashik Bharat Jodo Nyay Yatra Jairam Ramesh marathi news)

जयराम रमेश म्हणाले, की नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०२० ला लागू केलेल्या कायद्यानंतर शेतकऱ्यांनी १५ महिने संघर्ष केला. संघर्षादरम्यान तब्बल सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. १९ नोव्हेंबर २०२१ ला कायदे मागे घेतल्याची नामुष्की सरकारवर आली आणि योगायोग म्हणजे याच दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा वाढदिवस होता, हे पंतप्रधान मोदींना कदाचित माहीत नसल्याने त्यांनी हा दिवस निवडला. माहीत असते, तर श्रेयवादासाठी त्यांनी तारीख पुढे ढकलली असती.

या यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. बाळासाहेब थोरात यांनी गांधींची गॅरंटी ही सर्वसामान्य लोकांना विश्वास देणारी असून, ‘यूपीए’च्या काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता सुखी होती, असे सांगितले. पत्रकार परिषदेस विश्वजित कदम, माजी मंत्री शोभा बच्छाव, डॉ. अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, अनिल कदम, हेमलता पाटील, हेमंत जाधव, सुनील बाफना आदी उपस्थित होते.

काय आहेत गांधींची पाच गॅरंटी

- एमएसपी कायदा लागू करणार

- स्वामीनाथन आयोग लागू करणार

- आयात- निर्यातबंदी धोरणाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा

- पंतप्रधान फसल बिमा योजना

- कृषी यंत्रसामुग्री, खते, अवजारांवर जीएसटी माफ करू

Congress Politicians press conference at chandwad
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: त्र्यंबकेश्‍वर मंदिरात राहुल गांधींनी केला अभिषेक; ठिकठिकाणी स्वागत

शेतकरी हित हाच इंडिया आघाडीचा केंद्रबिंदू

चांदवड येथे शेतकरी मेळाव्यातून राहुल गांधींनी शेतकऱ्यांसाठी पाच गॅरंटी घोषित करून थेट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हात बळकट करणार असल्याचे सांगितले. काँग्रेससह इंडिया आघाडीचा केंद्रबिंदू हा प्रथम शेतकरी हित राहील हे अधोरेखित केले गेले.

विशेष म्हणजे याच मेळाव्यात शरद पवार यांनी मांडलेले कांद्याबाबतचे अभ्यासपूर्वक मुद्दे आणि त्याला अनुसरून गांधींनी केलेली घोषणा बघता मोदींच्या पाच गॅरंटी विरूध्द गांधींच्यामोदीं गॅरंटीत मोठा सामना होणार हे नक्की. इंडियाने शेतकरी मतांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.

मणिपूर ते मुंबई या यात्रेच्या ६१ व्या दिवशी गांधींनी कांदा उत्पादनाच्या पट्ट्यात घटक पक्षांच्या साक्षीने पाच मुद्द्यांची केलेली घोषणा आगामी निवडणुकांसाठीचा अजेंडा स्पष्ट करणारी आहे. दिल्लीच्या किसान आंदोलनात सातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पंधरा महिन्याचे आंदोलन आणि त्यातून उद्भवलेली परिस्थिती जयराम रमेश यांनी नमूद केली. हे बघता चांदवड येथील झालेला शेतकरी मेळावा,शेतकऱ्यांनी केलेली मोठी गर्दी पाहता येणाऱ्या निवडणुकीत चुरस होणार असा कयास बांधला जात आहे.

पवार विरूध्द भगरे सामना?

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरुध्द शिक्षक असलेले भास्कर भगरे हा सामना जवळपास निश्चित मानला जात आहे. निफाड, चांदवड, दिंडोरी, देवळा, नांदगाव, कळवण हा ग्रीन बेल्ट आहे. घोषित केलेल्या पाच गॅरंटीवर इंडिया आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पदर खोचून काम केल्यास ही लढत मोठी चुरस निर्माण करेल. भारत जोडो यात्रा येऊन गेली, चैतन्य आले आता डोअर टू डोअर काम करावे लागणार आहे.

Congress Politicians press conference at chandwad
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: बड्यांना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com