नाशिक: भारतनगर येथे भाजीपाला विक्रेते बाप-लेकांना सराईत गुन्हेगारांनी तलवारी, कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड हिसकावली. परिसरात दहशत माजवून कारमधून पसार झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात दरोड्यासह जबरी लूट व शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.