Nashik Water Crisis : इगतपुरी तालुक्यात मोठ्या धरणांनी गाठला तळ! धरणकाठच्या वाड्यांना टँकरद्वारे पाण्याची प्रतीक्षा

Nashik News : धरणातील जलसाठ्याने तळ गाठल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. यामुळे आगामी काळातही पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसण्याची चाहूल लागली आहे.
Only 28 percent water storage is left in Mukne Dam.
Only 28 percent water storage is left in Mukne Dam.esakal

इगतपुरी : इगतपुरी तालुका म्हणजे पाण्याचे कोठार आणि धरणांचा तालुका असूनही उन्हाळ्याच्या अंतिम चरणात या तालुक्याच्या पूर्व भागात तसेच, डोंगराळ व वाड्यापाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे टंचाईचे तीव्र प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवू लागत आहे. या तालुक्यातील मोठ्या धरणांमध्ये जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे.

धरणातील जलसाठ्याने तळ गाठल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. यामुळे आगामी काळातही पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसण्याची चाहूल लागली आहे. तालुक्यातील बहुतांश धरणातील जलसाठा हा अवघ्या १२ ते १५ टक्यावर येउन ठेपला आहे. (Nashik Big dams in Igatpuri taluka reached bottom)

इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील काही वाड्यापाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात आता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत ११ प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर असल्याने त्यात धरणांलगतच्या वाड्या-पाड्यांचाही समावेश असल्याने टंचाईची तीव्रता लक्षात येते.

तालुक्यात सध्यस्थितीत तीन टँकरद्वारे पूर्व भागातील खेड परिसरातील दोन वाड्यांना तसेच मायदरा शिवारातील धानोशी व ठोकळवाडी येथे, तर आवळखेड या दुर्गम भागातील चांदवाडी व वाऱ्याची वाडी येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, या भागात टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दिवसेंदिवस वाढती पाणीटंचाई, पाण्याचे आटलेले स्रोत, बंद पडलेल्या योजना, दुरवरची साधने यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात बहुतांश गावांनी व ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे दिल्याचे सांगण्यात आले.

त्यात अतिदुर्गम भाग असलेल्या चिंचलेखैरे परिसरातील वाड्या, मुंढेगाव परिसरातील वाड्या, गुरुडेश्‍वर, वालविहिर, मांजरगाव, आंबेवाडी परिसरातील नांदूरकीची वाडी, मायदरा आदी भागातील प्रस्ताव प्रस्तावित आहे. प्रशासनाने या प्रस्तावाबाबत तत्काळ निर्णय घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेऊन परिसरातील खासगी विहिरी अधिग्रहित करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्याची गरज आहे. (Latest Marathi News)

Only 28 percent water storage is left in Mukne Dam.
Dhule Water Crisis : तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळित; देवपूरमधील काही भागाला फटका

या धरणांनी गाठला तळ

तालुक्यातील दारणा, मुकणे, भाम, भावली, वाकी, कडवा, वैतरणा आदी महत्वाची धरणे तसेच तळोशी, त्रिंगलवाडी, शेनवड बु॥, खेड आदी ठिकाणी लघुपाटबंधारे असून, त्यात आता जलसाठा कमालीचा घटला आहे. तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भाम, भावली, कडवा, दारणा या धरणात तर जेमतेम अवघा १२ ते २० टक्के साठा आहे.

उपलब्ध जलसाठा असा

दारणा : २२.८४ टक्के

मुकणे : २८.३१ टक्के

वाकी : ३९.६९ टक्के

भाम : १८.०२ टक्के

भावली : १२.४८ टक्के

कडवा : १५.११ टक्के

Only 28 percent water storage is left in Mukne Dam.
Water Crisis : शिराळ्यातील 41 गावांत पाणीटंचाई घोषित; वाळव्यातील रेठरे धरण, कार्वे तलावात उपसाबंदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com