नाशिक- आदिवासी आयुक्तालयासमोर ठाण मांडलेल्या बिऱ्हाड मोर्चेकऱ्यांना राजकीय नेत्यांकडून पाठिंबा वाढत असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता वाढली आहे. बुधवारी (ता. १६) माजी आमदार जे. पी. गावित व ‘सीटू’चे नेते डी. एल. कराड यांनी भेट घेत आंदोलनाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आंदोलकांचे शिष्टमंडळ गुरुवारी (ता. १७) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहे.