Nashik Naresh Karda Fraud Case: बिल्डर कारडा यांचा पाय खोलात! MPID अंतर्गत गुन्ह्यात अटकपूर्व जामीन ‘नामंजूर’

Crime News : उपनगर पोलिसात एमपीआयडीअंतर्गत दाखल गुन्ह्यात अशोका ग्रुपचे सर्वेसर्वा यांचाही समावेश असल्याने अशोक कटारिया यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते
Naresh Karda
Naresh Kardaesakal

Nashik Naresh Karda Fraud Case : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक व बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी वाढत असून, उपनगर पोलिसात चौथा गुन्हा तर आयुक्तालय हद्दीत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात दाखल एमपीआयडी अंतर्गत दाखल गुन्ह्यांविरोधात त्यांनी अटक पूर्व जामीन अर्ज केला असता, जिल्हा व सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.

त्यामुळे कारडा यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. दरम्यान, उपनगर पोलिसात एमपीआयडीअंतर्गत दाखल गुन्ह्यात अशोका ग्रुपचे सर्वेसर्वा यांचाही समावेश असल्याने अशोक कटारिया यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. (Nashik builder Naresh Karda Fraud Case Pre arrest bail denied)

गंगापूर रोड परिसरातील व्यापारी मनोज लेखराज हरीयानी (४६, रा. सिरन मीडोज, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित नरेश जगुमल कारडा, मनोहर जगुमल कारडा, अशोक मोतीलाल कटारीया, सतीश धोंडुलाल पारख, अनुप सुभाषचंद्र कटारीया यासह अन्य संचालकांविरोधात सुमारे ९९ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातही ‘एमपीआयडी’ कलम लावण्यात आले आल्याने संशयितांचा पाय खोलात गेला आहे.

कारडा यांच्याविरोधात फसवणुकीचे आठ तर एमपीआयडीअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कारडा यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या एमपीआयडीअंतर्गत अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी (ता. १६) सुनावणी झाली असता, न्यायालयाने अर्ज नामंजूर केला आहे. (latest marathi news)

Naresh Karda
Nashik Fraud Crime: कारडांसह अशोक कटारिया यांच्यावर उपनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा! गाळा विक्री प्रकरणी 99 लाखांची फसवणूक

संशयित कारडांविरुद्ध नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत मुंबई नाका, देवळाली कॅम्प पोलिसांत प्रत्येकी एक, उपनगरमध्ये चार व नाशिकरोडमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कारडा यांच्याविरोधात आणखीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून गुन्ह्यांची व्याप्तीही मोठी आहे. त्यामुळे कारडा यांच्या अटकेसाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहे परंतु ते पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Naresh Karda
Crime News: अत्याचार प्रकरणात 2 अल्पवयीन मुलं होती ताब्यात, बदला म्हणून वडिलांनी उचललं धक्कादायक पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com