Nashik burglary Crime : रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून साडेसात लाखांची घरफोडी! 3 घरफोड्यात 10 लाखांचा ऐवज चोरीला

Nashik News : अमृतधाम परिसरातील अयोध्यानगरीत बंद रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागदागिने चोरून नेत घरफोडी केली.
Burglary Crime News
Burglary Crime Newsesakal
Updated on

Nashik News : अमृतधाम परिसरातील अयोध्यानगरीत बंद रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागदागिने चोरून नेत घरफोडी केली. तर, यासह चोरट्यांनी तीन घरफोड्या करीत तब्बल १० लाख ३८ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागदागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Burglary worth seven and a half lakhs by breaking lock of row house)

अरविंद गोविंद आहिरे (रा. जानकी वल्लभ सोसायटी, अयोध्यानगरी, अमृतधाम, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ३०) ते बाहेर गेले असता, भरदिवसा दुपारी एक ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद दाराचा कडीकोयंडा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरुममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड, टीव्हीचा सेटअप बॉक्स असा ७ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला.

यात ६० हजारांची सोन्याची पोत, ६० हजारांचा राणी हार, १ लाख ३५ हजारांचा सोन्याच्या तीन चैन, ३० हजारांची अंगठी, ४५ हजारंची सोन्याची पोत, ७ हजार ५०० रुपयांची अंगठी, ४५ हजारांची मंगळसूत्र, ६० हजारांची सोन्याची शॉर्ट पोत, १ लाख ८० हजारांची सोन्याच्या चार बांगड्या, ४५ हजारांचे कानातील टॉप्स, २४ हजारांची नथ, १५ हजारांची सोन्याचे वेल.

३० हजारांची सोन्याची अंगठी, २० हजारांची रोकड असा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप हिंगमिरे (रा. कोमल रेसीडेन्सी, साधू वासवानी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते २० ते ३० जून दरम्यान मुंबईला गेले असता याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद फ्लॅटच्या गॅलरीच्या दरवाजाची काच फोडून आतील कडी उघडली. (latest marathi news)

Burglary Crime News
Jalgaon Crime : आंतरराज्यीय चोरट्याला भडगाव पोलिसांकडून अटक; दिल्ली, मुंबई, बंगळुरू कोलकत्ता राज्यात घरफोड्या

त्यानंतर चोरट्यांनी एक लाख एक हजारांचे सोन्याचे दागिने, व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. यात ३० हजारांची रोकड, ४० हजारांचा सोन्याचा क्वाईन, १० हजारांची चांदीची समई, १६ हजारांची अंगठी आदी ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड परिसरातील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ७७ हजारांचे दागिने चोरून नेले. राहुल दत्तात्रय ढेरिंगे (रा. गुरुआशिष अपार्टमेंट, चेहडी पंपींग रोड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १) सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी तिसर्या मजल्यावरील त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा १ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांचा अपेक्षाभंग

गंगापूर रोडवरील महेश बोरकर (रा. सुमंगल शिवशक्ती कॉलनी, गंगापूर विहार) हे रविवारी (ता. ३०) मध्यरात्री बाहेर गेले असता, अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता.१) सकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या बंद बंगल्याच्या दाराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरुममधील कपाट, बेड चोरट्यांनी उचकटले परंतु त्यांना काहीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने त्यांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burglary Crime News
Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.