Nashik Crime: नाशिकच्या व्यापाऱ्याची तांदूळ खरेदीपोटी फसवणूक; प. बंगालच्या व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Money Fraud
Money Fraudesakal

Nashik Crime : ऑनलाईन तांदूळ व्यापाऱ्याची संपर्क्र क्रमांक शोधून व्यवहार करणे नाशिकच्या व्यापाऱ्यांच्या अंगलट आले असून, त्यांची ८ लाखांची फसवणूक झाली.

धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याने ३५ टन तांदूळ खरेदीचे साडेआठ लाख रुपये दिल्यानंतरही माल न पोहोचल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik businessman cheated for buying rice case of fraud against west Bengal merchant Nashik Crime)

सूरजकुमार चौधरी (रा. सिलीगुडी बाजार, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. नारायण बापू चांदवडकर (रा. नंंदनवन सोसायटी, श्रद्धाविहार कॉलनी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, चांदवडकर यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.

त्यांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदीसाठी ऑनलाइन सर्च केले. त्यावेळी पश्चिम बंगालमधील संशयित चौधरी याचा संपर्क क्रमांक मिळाला. त्याच्याशी फोनवरुन झालेल्या संवादातून दोघांमध्ये ३५ टन तांदुळाचा व्यवहार ठरला.

त्यानुसार चांदवडकर यांनी चौधरीला ८ लाख ५२ हजार रुपये ऑनलाइन पाठविले. त्यानंतर तांदूळ चांदवडकर यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यांनी पुन्हा संपर्क साधले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

त्यावरुन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी संशयितांविरोधात फिर्याद दिली. सदरचा प्रकार २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुनहा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक भूषण सोनार हे करीत आहेत.

Money Fraud
Jalgaon Crime News : भाई का ‘बड्डे’ अन्‌ चिंग्याचा राडा; जिल्हा कारागृहात कैद्याकडून यंत्रणा वेठीस

जमीन खरेदीत एकाची फसवणूक

वाडीवऱ्हे येथील अकरा एक जमिनीची खरेदीसाठी नाशिकरोडच्या एकाला संशयितांनी ९० लाखांना गंडा घातला आहे.

नाशिकरोड परिसरातील जेम्स प्रसाद वरसाला (रा. हरिनिवास, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पद्‌माकर घुमरे, सुनीता घुमरे उर्फ सुनिता भंडारे यांनी संगनमत सन २०१४ मध्ये वरसाला व संशयितांमध्ये गंगापूर रोड परिसरात जमीन खरेदीसाठी व्यवहार झाला.

९० लाख दिल्यानंतर जमीन खरेदी न करता संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी पैसे वापरुन फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक बैसाने हे तपास करीत आहेत.

Money Fraud
Nashik Bribe Crime: वीजमीटर बसवून देण्यासाठी 7 हजारांची घेतली लाच; वाडीवऱ्हेच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह दोघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com