celebration in Dhanvantari Hospital with victory of Dr.  Shobha Bachhav
celebration in Dhanvantari Hospital with victory of Dr. Shobha Bachhavesakal

Nashik Lok Sabha Election : डॉ. शोभा बच्छाव यांच्या विजयाने ‘धन्वंतरी’त दिवाळी; कॉंग्रेस कमिटीत सत्कार

Nashik News : लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदार संघातून डॉ. शोभा बच्छाव या जायंट किलर ठरत खासदार झाल्या.

Nashik News : लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदार संघातून डॉ. शोभा बच्छाव या जायंट किलर ठरत खासदार झाल्या. त्यांच्या विजयाने त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पेठरोडवरील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. जळगावमधील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. (Nashik celebration in Dhanvantari Hospital with victory of Dr Shobha Bachhav)

मात्र नाशिकसह दिंडोरी, धुळे व नंदुरबार लोकसभा मतदार संघातून आघाडीने चांगली कामगिरी नोंदवित विजय प्राप्त केला. यातील धुळ्यातील शोभाताई यांचा विजय हा वेगळा ठरला. सुरवातीला उपऱ्या म्हणून हिणविल्या गेलेल्या ताईंच्या पारड्यात मतदारांनी विजयश्री टाकली. केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या डॉ. सुभाष भामरे यांचा त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पराभव केला.

नगरसेविका, महापौर, मंत्री

डॉ. शोभा बच्छाव या नव्वदच्या दशकात पेठ रोड परिसरातून काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. त्यानंतर नाशिकच्या पहिल्या महिला महापौर म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्या शहराच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात शेवटच्या टप्प्यात त्यांना राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र अल्प काळासाठी का होईना, त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले.

शोभाताई यांचे धुळ्याहून नाशिकला आगमन झाले. त्यानंतर ताईंचे कार्यक्षेत्र असलेल्या पेठ रोडवरील धन्वंतरी हॉस्पिटलमधील सर्वांनीच जणू दिवाळीच साजरी केली. आगमनानंतर ताईंचे औक्षण करण्यात आले. फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत ताईंचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेस कमिटीत डॉ. बच्छाव यांचा सत्कार करण्यात आला. (latest marathi news)

celebration in Dhanvantari Hospital with victory of Dr.  Shobha Bachhav
Nashik Lok Sabha Election : पराभवाची भाजपकडून झाडाझडती; प्रदेश कार्यालयाने मागविला अहवाल

‘आनंद गगनात मावेना’

धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये गेल्या पंधरा वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या सरला शिरसाट व संध्या गायकवाड यांना ताईंच्या विजयाबाबत विशेष आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाने भरभरून दिले : डॉ. बच्छाव

याविजयामागे मतदार संघातील मतदारांबरोबरच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांची जिवापाड मेहनत कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया डॉ. शोभा बच्छाव यांनी ‘सकाळ’ शी बोलताना नोंदविली. या विजयामुळे राजकारणातील माझ्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह त्यांच्या विजयात खांद्याला खांदा लावून काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्या त्यांचे पती डॉ. दिनेश बच्छाव यांनीही नोंदविली.

celebration in Dhanvantari Hospital with victory of Dr.  Shobha Bachhav
Nashik Lok Sabha Constituency : महायुतीच्या धर्माला अनेकांकडून ‘खो’; हेमंत गोडसे यांचा छगन भुजबळांवर निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com