Nashik Jail Ganja Party Viral Videos
esakal
नाशिक
Nashik Jail Video : बघू ते नवलच! नाशिकच्या जेलमध्ये कैद्यांनी केली गांजा पार्टी; धक्कादायक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल
Nagpur Central Jail Ganja Party Video : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी गांजा पार्टी केल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत
Nashik Jail Drugs Party Video : नाशिक पोलिसांच्या कायद्याचा बालेकिल्ला मोहिमेने गुन्हेगारांना धडकी भरली असताना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी कायदा धाब्यावर बसवला.. गांजासह अमली पदार्थांच्या पार्टीचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मकोका, खुनासारखे गंभीर गुन्हे करणारे कैदी मातीच्या चिलमीत गांजा ओढत, मोबाईलवर सेल्फी काढत दिसत आहेत. यामुळे कारागृह सुरक्षेवर मोठा सवाल उपस्थित झाला असून तपास जोरात सुरू आहे.

