Chhagan Bhujbal : महायुतीच्या बैठकीत माझ्या नावाची चर्चा

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितलेली नाही. मात्र दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीतच माझे नाव ठरले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal esakal

Chhagan Bhujbal : मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितलेली नाही. मात्र दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीतच माझे नाव ठरले आहे. ते मी ‘कन्फर्म’ केले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अशी चर्चा झाल्याचे सांगितले आहे. असे असले तरी अजून कुठलाही निर्णय झालेला नसून जे काही आहे, ते फक्त सूत्रांची माहिती असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ()

येवल्याच्या दौऱ्यावर आलेल्या भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. मी कुठेही गेलो तरी येवल्यातच राहील, गेले वीस वर्षे अडचणीत झालेली मदत मी कधीही विसरणार नाही. येवल्याचे आणि माझे नाते अतूट आहे, असे सुरवातीलाच भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मी येवला कुठे सोडला, असा सवाल करीत येवला सोडणार नाही. निवडून गेलो, तरी अजिबात सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारीसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा आग्रह योग्यच आहे, ते दोन टर्मपासून खासदार आहेत. भाजपचेही १०० नगरसेवक आणि तीन आमदार नाशिकमध्ये असल्याने त्यांचाही आग्रह योग्य असून, ते चुकले असे अजिबात म्हणता येत नाही. (latest marathi news)

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : कौशल्याधिष्ठित शिक्षणासाठी संस्थांनी काम करावे : मंत्री छगन भुजबळ

सर्वच आग्रह धरणार आहेत. मात्र ज्याला तिकीट मिळेल, त्याचे सर्वानुमते आम्ही काम करू. उमेदवारीचा अंतिम निर्णय नेतेमंडळी घेतील, असे भुजबळ म्हणाले. महायुतीत ठरल्याप्रमाणेच जागांचा निर्णय होणार आहे. मी सुरवातीला उमेदवारीसाठी नाही सांगितले होते. मात्र पक्षाने अन् महायुतीने सांगितले तर मी उभा राहणार आहे. जेव्हा पक्षाला आपली गरज आहे, तेव्हा ते ‘चॅलेंज’ आपण स्वीकारले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत माझे नाव चर्चेला आले आणि ते ठरलेही असल्याचे मला कळाले. याबाबत फडणवीस यांनीही होकार दिला आहे. मात्र अजून नक्की काही नसून, फक्त सूत्रांची माहिती असल्याची गुगली त्यांनी टाकली. मी माझा आग्रह धरलेला नाही. मात्र जेव्हा होईल, तेव्हा ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांसह कुटुंबीयांना महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com