Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde esakal

Nashik Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात ‘ऑपरेशन नाथ’; CM शिंदे यांनी केले सुतोवाच

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये ‘ऑपरेशन लोट्स’चा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik News : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये ‘ऑपरेशन लोट्स’चा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही ‘ऑपरेशन नाथ’ राबविले जाणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. (Chief Minister Eknath Shinde mention of Operation Lots created stir)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ८) पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. मेळाव्यात त्यांनी ‘ऑपरेशन नाथ’चा उल्लेख केला. ते म्हणाले, की निवडणूक प्रचारानिमित्त बेळगाव येथे गेल्यानंतर उत्सुकतेने तेथील भाजपचे पदाधिकारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून भेटायला आले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा नाथ, हे त्यांना पाहायचे होते. त्या वेळी त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही ‘नाथ ऑपरेशन’ होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याच विषयावर माध्यमांशी स्वतंत्रपणे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ते जाऊ द्या, असे सांगताना हास्य करत उत्तर देण्याचे टाळले. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर करताना उशीर झाला.

त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. यावर उत्तर देताना शिंदे यांनी राज्यात महायुतीची ताकद मोठी आहे. त्यामुळे उशिराने उमेदवार जाहीर झाला, तरी काही फरक पडत नाही. लोकांचीदेखील महायुतीला साथ असल्याचे सांगितले. या वेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. पालकमंत्री दादा भुसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सरोज अहिरे, सुहास कांदे आदी उपस्थित होते. (latest marathi news)

Chief Minister Eknath Shinde
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

महायुतीत मनोमिलन

नाशिक लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेदेखील इच्छुक होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरत ती जागा पदरात पाडून घेतली. त्यानंतर मात्र महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी एक झाले नाहीत. गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका खासगी हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती.

त्या बैठकीला नाशिक लोकसभा मतदारसंघातील पाचही आमदारांनी दांडी मारली. सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे अद्यापही प्रचारात व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झालेले नाहीत. या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी महायुतीचे घटकपक्ष तसेच नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन झाल्याचा दावा केला.

Chief Minister Eknath Shinde
Nashik Lok Sabha Election : वयोवृद्ध, दिव्यांगांचे आजपासून मतदान; नाशिक मध्य विधानसभेत 1 हजार 264 वृद्ध, 212 दिव्यांग मतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com