Latest Marathi News | यशू जन्‍माचा भाविकांकडून जल्‍लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crismas Celebration

Nashik News : यशू जन्‍माचा भाविकांकडून जल्‍लोष

नाशिक : ख्रिस्‍ती बांधवांचा सर्वात मोठा सण असलेल्‍या नाताळाचा उत्‍साह शहर परिसरात बघायला मिळाला. शनिवारी (ता.२४) रात्री उशिरा मिस्सा (प्रार्थना) पठण करताना दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. त्र्यंबकनाका सिग्‍नलवरील होली क्रॉस चर्चमध्ये भाविकांनी सहकुटुंब हजेरी लावताना प्रभू यशू जन्‍माचा जल्‍लोष केला.

होली क्रॉस चर्च येथे नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्‍यानुसार शनिवारी रात्री नऊला कॅरल सिंगिंग (भक्‍ती गीते) कार्यक्रम पार पडला. यानंतर द्विभाषिक मिस्सा (प्रार्थना) पठण करण्यात आले. यावेळी उपस्‍थित समाज बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्‍छा देताना जल्‍लोष केला. (Nashik Christian people Celebrate Christmas Natal happily Nashik News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : मालेगावात ॲप्पल बोरची धूम! रोज पंधराशे कॅरेटची आवक

दरम्‍यान नाताळनिमित्त शहर परीसरातील चर्चमध्ये विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आलेली आहे. यशू जन्‍माचा गोठ्यातील देखावा आलेल्‍या भाविकांचे लक्ष वेधणारा ठरत होता. या ठिकाणी छायाचित्रे टिपण्याची लगबग बघायला मिळाली.

आज दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल

नाताळच्या दिवशी उद्या (ता.२५) चर्चमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. होली क्रॉस चर्च येथे सकाळी आठला द्विभाषिक मिस्सा होईल. सायंकाळी मिस्सा होणार नसल्‍याचे कळविण्यात आले आहे. सायंकाळी साडेपाचला आंतरधर्मीय नाताळ कार्यक्रमात विविध धर्मातील मान्‍यवर एकत्र येऊन हा सण साजरा करणार आहेत.

‘गेटवे’ मध्ये क्रिसमस कॅरल गाण्यांचे आयोजन

नाताळच्या पूर्वसंध्येला हॉटेल गेटवे येथे क्रिसमस कॅरल गाण्यांचे आयोजन केले होते. सेंट झेवियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत नाताळची गाणी सादर केली. देश-विदेशातील पर्यटक निमित्त हॉटेल गेटवेला येत असतात. त्‍यांच्‍यासाठी उपक्रम राबविल्‍याची माहिती हॉटेलचे सरव्यवस्थापक ख्रिस्तोफर वेगस यांनी दिली. अशा प्रकारचा उपक्रम नाशिकमध्ये प्रथमच राबविला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पुढील सात दिवस नाताळचा आनंद उत्सव चालणार आहे. विशेष मेनूदेखील तयार केला असल्‍याचे शेफ अभिजित चक्रवर्ती यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik News : NMCत करसल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय!

टॅग्स :NashikCelebration