
नाशकात चर्चमध्ये नमाज पठण; अनोख्या 'इफ्तार'ची पर्वणी
नाशिक : राज्यभर मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण तापलेलं असताना नाशिकमधील एका चर्चमध्ये नमाज पठण करण्यात आलं आहे. नाशिकमधील हॉली क्रॉस चर्चमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधवांनी मिळून नमाज पठण केल्याची माहिती अजमल खान यांनी दिली.
आम्ही सर्व पक्षांतील नेत्यांना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रण दिले असून त्यांनी आमच्या निमंत्रणाचा स्विकार केला आहे. तसेच चर्चमधील फादरने चर्चमध्ये इफ्तार पार्टीची व्यवस्था करणार असल्याचं सांगितलं असून त्यांनी आमच्याबरोबर नमाज पठणही केलं असल्याचं अजमल खान यांनी सांगितंल आहे. त्यामुळे आता इफ्तार पार्टी चर्चमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. राज्यभर निर्माण झालेल्या सामाजिक वादामध्ये चर्चमध्ये नमाज पठण ही समाजाच्या दृष्टीने सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवणारी गोष्ट आहे.
हेही वाचा: PMPMLच्या खासगी कंत्राटदारांचा संप; वाहतूकीत खोळंबा
त्यानंतर भोंग्याच्या प्रकरणावर प्रशासकीय पातळीवर पावले उचलण्यात आली असून पोलिस महासंचालक जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन चर्चा करत निर्णय घेण्यात येत आहेत. नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी सर्वांना भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले होते. परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नाही, असं दिपक पांडे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनाधिकृत भोंग्यांबाबत परिपत्रक जारी करणारं नाशिक हे राज्यातील पहिलं शहर ठरलं आहे. त्यानंतर आता परवानगी नसलेल्या भोंग्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यभर सामाजिक तेढ निर्माण झाला आहे. मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत खाली उतरवले नाही तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर राज्यभर आणि देशभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. तर मुस्लीम संघटनांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यास मनाई केली असून राज्यातील काही मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला असल्याचं पहायला मिळत आहे.
Web Title: Nashik Church Namaz Iftar Party Invitation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..