स्वप्नांना भुलली अन्‌ प्रेमाच्या जाळ्यात फसली !

Minor Girl Kidnapped from CIDCO Area in Nashik : अल्पवयीन मुलगी खासगी वाहनावर चालक असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली. त्यानेही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्वप्ने दाखविली. त्या स्वप्नांना ती भुलली अन्‌ जन्मदात्यांना अंधारात ठेवून प्रियकराबरोबर निघून गेली.
Girl Kidnapping

Girl Kidnapping

sakal 

Updated on

सिडको परिसरात राहणारी शालेय शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी खासगी वाहनावर चालक असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली. त्यानेही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्वप्ने दाखविली. त्या स्वप्नांना ती भुलली अन्‌ जन्मदात्यांना अंधारात ठेवून प्रियकराबरोबर निघून गेली. अंबड पोलिसांत अपहरणासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. महिला पोलिस उपनिरीक्षक सविता उंडे यांनी शिताफीने तपास करीत त्याची रवानगी कारागृहात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com