Nashik Water Scarcity : सहा धरणं उशाशी नागरिक मात्र उपाशी! पाणीटंचाईने दिंडोरी तालुक्यातील नागरिक त्रस्त

Water Crisis : धरण उशाशी पण नागरिक मात्र उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वच धरणांमध्ये गाळ साचल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी गंभीर होत चालला आहे
Water storage in Palkhed Dam
Water storage in Palkhed Damesakal

दिंडोरी : जिल्ह्यातील सर्वात जास्त धरणे असलेला तालुका म्हणून दिंडोरी तालुक्याची ओळख. तालुक्यात पालखेड , ओझरखेड, तिसगाव ,पुणेगाव, वाघाडी, करंजवण अशी सहा मोठी धरणे झाली असूनही तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संर्घष करावा लागतो आहे. त्यामुळे धरण उशाशी पण नागरिक मात्र उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वच धरणांमध्ये गाळ साचल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी गंभीर होत चालला आहे. (Nashik dindori taluka suffering water shortage)

वणी कसबे व दिंडोरी शहराला दोन दिवसांनी नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. ब्रिटीश काळात एकमेव पालखेड धरण होणार होते. तालुक्यातील ६५ गावांचे स्थलांतर होणार होते.पण स्थानिक जनतेने विरोध करत ब्रिटिश सरकारचा निर्णय हाणून पाडल्याने नंतरच्या काळात सहा धरण झालेल्या या तालुक्यातील सगळ्याच धरणात गाळ साचल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. फक्त मृत पाणीसाठ्यावर या भागातील नागरिकांची गुजराण सुरु आहे.

सगळीकडे टंचाई स्थिती

ओझरखेड धरणातून दिंडोरी वणी कसबे तसेच चांदवड तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो. पालखेड धरणातून मोहाडी, ओझरमिग, विमानतळ परिसरात पाणी पुरवठा केला जातो. सध्या करंजवण धरणातून मनमाड शहरात पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. जर एवढे पाणी उचललेले तर धरणांमध्ये पाणी शिल्लक राहणार नाही. (Latest Marathi News)

Water storage in Palkhed Dam
Jalgaon Water Crisis : वरणगावात 15 दिवसांआड पाणीपुरवठा; योजनांवरील कोट्यवधींचा खर्च पाण्यात

साठवण क्षमतेवर ताण

पाण्याच्या योजना १० हजार लोक संख्या असताना मंजूर झाल्या तर आजची लोकसंख्या २५ हजार आहे. त्यामुळे पन्नास टक्के नागरिकांना पिण्याचे पाणी देण्याची धरणाची क्षमता आहे. शहरी भागात वाढत्या लोकसंख्येमुळे तालुक्यातील पाणी जिल्ह्यासाठी मात्र तालुक्यातील लोक मात्र उपाशी अशी तालुक्यातील नागरिकांची स्थिती झाली आहे.

Water storage in Palkhed Dam
Nashik Water Crisis : इगतपुरी तालुक्यात मोठ्या धरणांनी गाठला तळ! धरणकाठच्या वाड्यांना टँकरद्वारे पाण्याची प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com