Nashik Citylink Bus : सिटीलिंक बससेवा पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर! 7 जुलैला संपणार ठेक्याची मुदत

Nashik News : महापालिकेने गाजावाजा करत सुरू केलेली सिटीलिंक बस सेवा दहा वेळा संपाला तोंड दिल्यानंतर पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
Citylink Bus
Citylink Busesakal

Nashik News : महापालिकेने गाजावाजा करत सुरू केलेली सिटीलिंक बस सेवा दहा वेळा संपाला तोंड दिल्यानंतर पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. येत्या सात जुलैला वाहक कंत्राट संपुष्टात येत असल्याने व आतापर्यंत नवीन कंत्राटदार नियुक्त करण्याची कुठलीच हालचाल न झाल्याने आपोआप सेवा बंद पडणार आहे. (Citylink bus service on verge of closure again)

त्यामुळे सिटी लिंक कंपनी प्रशासनाची धावपळ उडाली असून कुठल्याही परिस्थितीत सेवा बंद पडणार नसल्याचा दावामात्र प्रशासनाकडून केला जात आहे. महापालिकेच्यावतीने आठ जुलै २०२१ पासून शहर व सेवा सुरू करण्यात आली. नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटी लिंक-कनेक्टिंग नाशिकच्या माध्यमातून सद्य:स्थितीमध्ये शहरात दोनशे सीएनजी तर ५० डिझेल बसेस धावत आहे.

बसेससाठी वाहक पुरवठादाराचे काम आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. ठेकेदाराकडून नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा न करणे, कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई या कारणांमुळे आत्तापर्यंत दहा वेळेस संपाला सामोरे जावे लागले.

सुरवातीला पसंतीस उतरलेली सिटीलिंक बस सेवा नाशिककरांच्या मनातून उतरली आहे. मात्र, आता सिटीलिंक कंपनीला पुन्हा नव्याने संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील आठवड्यात बस सेवा संपूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. (latest marathi news)

Citylink Bus
Nashik News : मध्यप्रदेश सरकारकडून सीमेवरील नाके बंद!

दीडशे वाहकांचा प्रश्‍न

वाहक पुरवठादार करण्याचे काम मॅक्स डिटेक्टिव्ह ॲण्ड सिक्युरिटीज या दिल्लीच्या कंपनीला देण्यात आले आहे. सात जुलै रोजी करार संपुष्टात येत आहे. नवीन करार आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया उघडणे, ठेकेदार समवेत वाटाघाटी करणे, ठेकेदाराशी पत्रव्यवहार करणे, दीड कोटींची बँक हमी भरून घेणे.

करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे त्यानंतर वाहकांना प्रशिक्षण देणे व त्यानंतर भरती करणे आदी प्रकारच्या प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. हा कालावधी अधिक वेळ घेणारा आहे. सात जुलैपर्यंत जुन्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला मुदतवाढ द्यायची असल्यास करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार दोन वर्षासाठी द्यावी लागणार आहे.

त्यामुळे सिटीलिंक कंपनी प्रशासन अडचणीत सापडले आहे. सात जुलैपर्यंत नवीन ठेकेदार नियुक्त केल्यास दीडशे बसेसचे तीन शिफ्टमध्ये सुरू असलेले वाहकांचे काम बंद पडेल. वाहक नसल्याने दीडशे बसेसची सेवाच बंद पडणार आहे.

Citylink Bus
Nashik Encroachment : विधीमंडळातील लक्षवेधीनंतर अतिक्रमण कारवाई! शहरातील 2 हजार 791 अतिक्रमण धारकांना नोटिसा

विभागीय आयुक्तांकडे तक्रार

सोळा मार्चपासून लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू झाली होती त्या पाठोपाठ विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया आचारसंहितेत खुली करता येत नाही असे असले तरी सिटी लिंक कंपनीच्या वतीने फायनान्शिअल बीड खुले करण्यात आल्याने आचारसंहितेचा भंग होत महिन्याचा दावा करत ठेकेदार कंपनीकडून विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे.

तर सिटी लिंक प्रशासनाकडून फायनान्शिअल बीड ओपन करता येते मात्र कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला देता येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

"नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया आचारसंहितेमुळे अडकली आहे. फायनान्शिअल बीड खुले करण्यात आले असून सात तारखेपर्यंत प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न आहे. सिटीलिंक बस सेवा बंद पडणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे." - मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक.

Citylink Bus
Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com