Nashik Citylinc Bus : सिटीलिंक बससेवा आजपासून सुरळीत; वाहकांच्या संपावर अखेर तोडगा

Citylinc Bus : गेल्या आठ दिवसांपासून तपोवन डेपोतील सिटीलिंक बससेवेच्या वाहकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप अखेर शुक्रवारी (ता.२२) मागे घेतला आहे.
Finally a positive solution to the strike of Citylink carriers, bus services will start at full capacity from today
Finally a positive solution to the strike of Citylink carriers, bus services will start at full capacity from todayesakal

Nashik Citylinc Bus : गेल्या आठ दिवसांपासून तपोवन डेपोतील सिटीलिंक बससेवेच्या वाहकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप अखेर शुक्रवारी (ता.२२) मागे घेतला आहे. त्यामुळे सायंकाळपासून नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक आता पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. शनिवार (ता.२३) सकाळ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहेत. (Nashik Citylink bus service start from today marathi news)

तपोवन डेपो येथील सिटी लिंक बस सेवेचा वाहक पुरविण्याचा ठेका मे. मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटी या कंपनीला दिलेला आहे. गुरुवारी (ता.१४) वाहकांनी थकीत वेतन, पीएफ,ईएसआयसी व रजेचे पैसे अकाउंटला जमा करणे, इंक्रिमेंट, बोनस अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. शुक्रवारी (ता.२२) सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांची बैठक झाली.

या बैठकीत एजन्सीचे प्रतिनिधी व वाहक प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत संबंधित कंपनी ठेकेदार यांनी वाहकांच्या काही मागण्या मान्य केल्या तर उर्वरित ज्या मागण्या तत्काळ पूर्ण करणे शक्य नाही, अशा मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अखेर सिटीलिंक बससेवेच्या वाहकांनी पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.(latest marathi news)

Finally a positive solution to the strike of Citylink carriers, bus services will start at full capacity from today
Nashik Citylinc Bus : बेशिस्त बसचालकांना शिस्त लावावी; सिटीलिंक व्यवस्थापकांकडे मागणी

वाहकांच्या संप मागे घेण्याच्या निर्णयामुळे आता नाशिककरांची जीवनवाहिनी असलेली सिटीलिंक बस ९ दिवसांनंतर पुन्हा एकदा नाशिकच्या रस्त्यांवर धावणार आहे. तपोवन डेपो येथील बसेस सायंकाळीच सुरू होणार असल्यातरी शनिवार (ता.२३) सकाळ पासून पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावणार आहेत.

दिलगिरी व्यक्त करून आवाहन

वाहक संपामुळे गेले ९ दिवस प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्याबद्दल सिटीलिंक प्रशासन सर्व प्रवाशांचे दिलगीर आहे. तसेच बससेवा नियमित सुरू होत असल्याने प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.

Finally a positive solution to the strike of Citylink carriers, bus services will start at full capacity from today
Nashik Citylinc Bus Strike : वेतन अदा करूनही कर्मचारी संप कायम; सिटीलिंक प्रशासन मेटाकुटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com