esakal | नाशिककरांना पुन्हा हुडहुडी! यंदाच्‍या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद 
sakal

बोलून बातमी शोधा

cold-in-nashik.jpg

यंदाच्‍या हंगामातील हे नीचांकी तापमान असून, महाबळेश्‍वरपेक्षाही अधिक गारवा नाशिकला जाणवू लागला आहे. यातून शेकोट्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. 

नाशिककरांना पुन्हा हुडहुडी! यंदाच्‍या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद 

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : नोव्हेंबरच्या सुरवातीला जाणवणारी थंडी दिवाळीच्या काळात अचानक गायब झाली होती. या काळात तापमानातही वाढ झाली होती. मात्र डिसेंबरच्या सुरवातीपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. रविवारी (ता. ६) नाशिकचे किमान तापमान १०.१ अंश सेल्‍सिअस इतके नोंदविले गेले आहे. यंदाच्‍या हंगामातील हे नीचांकी तापमान असून, महाबळेश्‍वरपेक्षाही अधिक गारवा नाशिकला जाणवू लागला आहे. यातून शेकोट्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. 

नीचांकी तापमानाची नोंद; किमान तापमान १०.६ वर 
वातावरणातील बदलामुळे दुपारच्या सुमारास कडक ऊन, तर सायंकाळ व सकाळच्या सुमारास नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्याच्या सुरवातीला १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेल्या पाऱ्यात चक्रीवादळामुळे पुन्हा वाढ झाली होती. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमान कमाल ३० अंश सेल्सिअसच्या पुढे सरकले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून पारा चांगलाच खाली आला असून, रविवारी नीचांकी १०.१ अंश सेल्‍सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

कमाल तापमान २९.३ 
किमान तापमानात घट होत असतानाच दुसरीकडे कमाल तापमान व किमान तापमान यात मोठा फरक गेल्या काही दिवसांपासून जाणवत होता. एकीकडे किमान तापमान घसरत असताना कमाल तापमानातही घट होत आहे. त्यातच रविवारी कमाल तापमान ३० अंशांच्या खाली आले असून, २९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा
पुण्यातही हुडहुडी 
नाशिकप्रमाणे पुणेदेखील गारठले असून, पुण्याचे किमान तापमान १०.४ अंश सेल्‍सिअस नोंदविले गेले आहे. पाषाणचे किमान तापमान १०.७, तर लोहगावचे तापमान १३.७ अंश सेल्‍सिअस राहिले.