Nashik News : बॉईज टाऊनचा वाद पुन्‍हा उफाळला! स्‍वयंअर्थसहाय्यला पालकांचा विरोध

Nashik : सर्व नियमांचे पालन करत इयत्ता पाचवीपासून स्‍वयंअर्थसहाय्य तत्त्वावर शाळा चालविणार असल्‍याचे शालेय प्रशासनाने सांगितले. तर या निर्णयाला काही पालकांनी विरोध दर्शविला आहे.
boys town school
boys town schoolesakal

Nashik News : येथील बॉईज टाऊन स्‍कूलसंदर्भातील वाद पुन्‍हा उफाळून आला आहे. शासनाचे सर्व नियमांचे पालन करत इयत्ता पाचवीपासून स्‍वयंअर्थसहाय्य तत्त्वावर शाळा चालविणार असल्‍याचे शालेय प्रशासनाने सांगितले. तर या निर्णयाला काही पालकांनी विरोध दर्शविला आहे. मंगळवारी (ता.३०) शाळेमध्ये पालकांसोबत याविषयी चर्चा करण्यात आली असली तरी ठोस तोडगा निघू शकलेला नाही. ( controversy of Boys Town school erupted again Parental opposition to self financing )

पी. एन. मेहता एज्‍युकेशन ट्रस्‍ट नाशिक संस्‍था संचलित बॉईज टाऊन इंग्‍लिश हायस्‍कूलच्‍या हस्तांतराचा प्रस्‍ताव यापूर्वी सादर करण्यात आला होता. जालना येथील नूपुर शिक्षण संस्‍था यांना हस्तांतर करण्यास पालकांनी विरोध दर्शविल्‍याने, हा प्रस्‍ताव रद्द केला होता. यानंतर आता अनुदानित तत्त्वावरील माध्यमिकचे वर्ग स्‍वयंअर्थसहाय्य करण्याच्‍या मुद्यावरुन पालक व प्रशासन यांच्‍यात संघर्ष निर्माण झालेला आहे.

शासनाच्‍या नियमांनुसार अनुदानित तत्त्वावरील शाळा परस्‍पर स्‍वयंअर्थसहाय्य तत्त्वावर करता येऊ शकत नाही. शिक्षकांची कमतरता असेल तर अल्पसंख्याक गटातून शाळेला मंजुरी असल्‍याने शिक्षक भरतीला अडसर नाही, असा पावित्रा पालकांनी घेतला आहे. शाळा अनुदानित स्वरूपात राहिल्‍यास शासनाचा, शिक्षण विभागाचा अंकुश राहील.

व स्‍वयंअर्थसहाय्य तत्त्वावर रुपातंरण केल्‍यास संस्‍थाचालकांची मनमानी वाढेल, अशी भीती पालकांकडून व्‍यक्‍त केली जाते आहे. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता.३०) शाळेत बैठक घेण्यात आली.पालकांनी दिलेल्‍या माहितीनुसार या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. तर शालेय प्रशासनाच्‍या सांगण्यानुसार पालकांच्‍या शंकांचे समाधान केले असून, अनेक पालकांनी शुल्‍क देखील भरले असल्‍याचा दावा मात्र शालेय प्रशासनाने सांगितले. (Latest Marathi News)

boys town school
Nashik News : मालेगावात 500 कोटीचे व्यवहार ठप्प! बाजार समितीचे 50 लाखांचे नुकसान

दरम्‍यान संस्‍थाचालकांनी हा निर्णय मागे घेतला नाही, तर आगामी काळात आंदोलनाचा पावित्रा घेतला जाईल. यापूर्वीच शाळा वाचविण्यासाठी समिती गठित केलेली आहे, या माध्यमातून सर्व कायदेशीर मार्गांनी लढा दिला जाईल, अशी भूमिका पालकांनी मांडली आहे.

''कायद्याच्‍या व शासनाच्‍या नियमांच्‍या आधीन राहून प्रक्रिया राबविली जात आहे. प्राथमिक व माध्यमिक असे दोन्‍ही स्‍वतंत्र युनिट आहेत. माध्यामिकला ४२ शिक्षकांची मंजुरी असताना केवळ सात शिक्षक कार्यरत आहेत. अशात शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी निर्णय घ्यावे लागत आहे. पालकांसमोर भूमिका मांडल्‍यानंतर अनेकांनी सहमती दर्शविली असून, शुल्‍कदेखील भरले आहे. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.''- रतन लथ, संस्‍थाचालक, बॉईज टाऊन हायस्‍कूल.

''शाळेला शिक्षक भरतीसाठी कुठलीही अडसर नसून, ते तातडीने शिक्षक भरती करू शकतात. अनुदानित तत्त्वावरील शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश राहील. व स्‍वयंअर्थसहाय्य तत्त्वावरील शाळेत संस्‍थाचालक आपल्‍या मर्जीने कारभार करतील. उन्‍हाळी सुट्या सुरु असून, पालकांशी चर्चा करून सर्व कायदेशीर मार्गांनी निर्णयाला विरोध करणार आहोत.''- एक पालक.

boys town school
Nashik News : पीसीबी ग्रुपला 95 टक्‍के हजेरी; जिल्ह्यातील 20 हजार 875 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com