esakal | नाशिकमध्ये दिवाणी न्यायालयात ‘व्हर्च्युअल’ कामकाज; कार्यालयातूनच विधिज्ञांचा युक्तिवाद
sakal

बोलून बातमी शोधा

virtual proceeding

नाशिकमध्ये दिवाणी न्यायालयात ‘व्हर्च्युअल’ कामकाज

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : येथील दिवाणी न्यायालयात दाव्याचे कामकाज ‘व्हर्च्युअल’ सुरू झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात न जाता घरातील कार्यालयातून व्हिडिओद्वारे विधिज्ञांनी युक्तिवाद केला. या उपक्रमाची सुरवात जिल्ह्यात करण्यात आली आहे. (virtual proceedings were started in the civil court in nashik)

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिकचे जिल्हा न्यायाधीश तथा ई-कमिटीने ‘व्हर्च्युअल’ माध्यमाद्वारे जिल्ह्यातील न्यायालयातील तातडीच्या दाव्यात कामकाज करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी (ता. २०) एका दाव्यात प्रतिवादींसाठी वरिष्ठ विधिज्ञ अनिल रामचंद्र देशपांडे यांनी त्यांच्या घरच्या कार्यालयातून ‘व्हर्च्युअल’ युक्तिवाद केला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ विधिज्ञांना त्यांच्या घरातील कार्यालयातून दाव्यांमध्ये युक्तिवाद करणे सोईचे होईल, असे मानले जात आहे. देशपांडे यांना ‘व्हर्च्युअल’ कामकाजासाठी मदत म्हणून त्यांचे सहाय्यक वकील प्रशांत जोशी, प्रीतीश कंसारा, विक्रम साळवे यांनी सहाय्य केले.

हेही वाचा: Redmi चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

न्यायालयीन कामकाजाबाबत २९ ला बैठक

महाराष्ट्र- गोवा वकील परिषदेतर्फे मुंबई उच्च न्यायालयाला न्यायालयीन कामकाजाची विनंती केली आहे. त्यानुसार २९ जुलैला मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी बैठक घेतली आहे, अशी माहिती परिषदेचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे यांनी दिली. ते म्हणाले, की मुंबई उच्च न्यायालयात ऑनलाइन कामकाज चालते. मात्र जिल्हा, तालुकास्तरावर ऑनलाइन कामकाजाचा खूप कमी वेळ मिळतो. सद्यःस्थितीत ५० टक्के मनुष्यबळावर खासगी आणि सरकारी कार्यालयात कामकाज चालते. त्यामुळे न्यायालयात कोरोनाविषयक सगळे नियम पाळून प्रत्यक्ष कामकाज सुरू व्हावे, अशी विनंती केली आहे. न्यायालयात उपस्थित राहून मास्क वापरून, शारीरिक अंतर राखून, हात स्वच्छ करत टप्प्याटप्प्याने कामकाज व्हावे, अशी इच्छा विधिज्ञांची आहे. त्यानुसार परिषदेने ही विनंती केली आहे.

(virtual proceedings were started in the civil court in nashik)

हेही वाचा: Pegasus ने तुमचा स्मार्टफोन संक्रमित केलाय का? असं घ्या जाणून

loading image