esakal | कोरानाचे जिल्‍ह्यात आणखी 35 बळी; एक हजार 93 पॉझिटिव्‍ह
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

जिल्‍ह्यात कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्‍यूंचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (ता. 26) जिल्‍ह्‍यात 35 बाधितांचा कोरोनाने बळी गेला. एक हजार 093 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

कोरानाचे जिल्‍ह्यात आणखी 35 बळी; एक हजार 93 पॉझिटिव्‍ह

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्‍यूंचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (ता. 26) जिल्‍ह्‍यात 35 बाधितांचा कोरोनाने बळी गेला. एक हजार 093 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर एक हजार 061 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णात तीनने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात 14 हजार 397 बाधितांवर उपचार सुरु आहेत. (nashik corona updates 35 patients died today in district)

जिल्‍ह्यातील बुधवारी गेलेल्‍या 35 बळींमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 19, तर उर्वरित 16 नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरात नाशिकरोड आणि पंचवटी परीसर प्रत्‍येकी तिघांचा समावेश आहे. पाथर्डी फाटा परीसरासह सातपूर, जेलरोड भागातील प्रत्‍येकी दोन बाधितांचा कोरोनाने मृत्‍यू झाला. याशिवाय अंबड, सिडको, जुने नाशिक येथील मृतांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सिन्नर व सुरगाणा तालुक्‍यातील प्रत्‍येकी चार मृतांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक तालुका, देवळा, मालेगाव ग्रामीण, दिंडोरी, नांदगाव, येवला, कळवण, निफाड तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका मृताचा समावेश आहे.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी सर्व संघटनांनी एकत्र यावे - राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक शहरातील 220 रुग्णांची कोरोनावर मात

दरम्‍यान नाशिक महापालिका क्षेत्रात 403 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये 674 तर मालेगाव महापालिका क्षेत्रात 16 रुग्‍णांचे अहवाल पॉझिव्‍हिट आले. कोरोनामुक्‍त रुग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक 796 रुग्‍णांचा समावेश आहे. नाशिक शहरातील 220 तर मालेगावच्‍या 45 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यातील दोन हजार 532 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 252, नाशिक ग्रामीणमध्ये एक हजार 125 तर मालेगावच्‍या 155 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 788 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 644 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी पाच रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 104 तर मालेगावच्‍या तीस रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: लूट करणाऱ्यांना मोकळीक तर दाद मागणाऱ्यांवर गुन्हे - जितेंद्र भावे