esakal | मराठा आरक्षणासाठी सर्व संघटनांनी एकत्र यावे - राधाकृष्ण विखे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Vikhe Patil

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आरक्षणासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व २६ संघटनांना एकत्रित यावे, हे माझ वैयक्तिक मत आहे. विविध संघटनांशी बोलणार असून, त्यासाठी नाशिकपासून सुरूवात केली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी सर्व संघटनांनी एकत्र यावे - राधाकृष्ण विखे पाटील

sakal_logo
By
विनोद बेदरकर


नाशिक : मराठा आरक्षण (Maratha Reservation) समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राज्य शासनाने या विषयाकडे गंभीरपणे न पाहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला. मात्र, सरकारवर या प्रश्नी दबाब आणण्यासाठी मराठा आरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सर्व २६ संघटनांनी एका व्यासपीठावर येउन सामूहीक नेतृत्वाखाली हा विषय पुढे नेण्याची गरज आहे. आरक्षण ही एकच भूमिका असेल, तर एकच संघटना का नको, असा प्रश्‍न माजी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी बुधवारी (ता. २६) येथे उपस्थित केला. (Radhakrishna Vikhe Patil said that all organizations need to come together for Maratha reservation)


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आरक्षणासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व २६ संघटनांना एकत्रित यावे, हे माझ वैयक्तिक मत आहे. विविध संघटनांशी बोलणार असून, त्यासाठी नाशिकपासून सुरूवात केली असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

पुढे विखे- पाटील म्हणाले, की आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्यानिर्णयाने (Maratha Reservaation Case) मराठा समाजात अस्वस्थता आहे. राज्य शासनाने वेळकाढूपणा केला. मंत्र्यांच्या वक्तव्यात विसंगती दिसून येते. सरकार म्हणून त्यांच्यात एकवाक्यता दिसत नाही. दुसरीकडे या विषयावर विविध २६ संघटना कार्यरत आहेत, पण आरक्षण हा विषय राजकीय नसून तो समाजाच्या अस्मितेचा आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यावर समाजातून प्रतिक्रिया आल्या. आंदोलनातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रश्नी केंद्र सरकारने पुर्नविचार याचिका दाखल केली असली तरी राज्य शासनानेही या विषयाकडे गांभीर्याने पाहावे. मराठा आरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सर्व संघटनांनी एका व्यासपीठावर येउन हा विषय पुढे नेला पाहिजे.

हेही वाचा: येवला ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख चिंताजनक


सामूहीक नेतृत्वाची गरज

आरक्षणाच्या विषयावर संबधित संघटनांनी एकत्र यावे, यासाठी सामूहीक नेतृत्व असले पाहिजे, ही आपली वैयक्तीक भूमिका आहे. नेतृत्व कुणी करावे हा विषय नाही. सर्व संघटना एकत्र येऊन नेतृत्व केले, तर सरकारवर दबाव आणता येईल. केंद्रात भाजपची सत्ता आहे. आपण भाजपचे लोकप्रतिनिधी असल्याने केंद्रावर दबाव आणण्यासाठी पुढे याल का? या प्रश्नावर ते म्हणाले, की सामूहीक नेतृत्वाचे निर्णय होतील, पण यात राज्याचे दायित्व जास्त आहे. मराठा समाजाला आरक्षण ही एकमेव भूमिका असेल, तर त्यासाठी प्रयत्न करायला एकच व्यासपीठ का नको, असा प्रश्न उपस्थित करीत ते म्हणाले, की क्रांती मोर्चा, सकल मराठा किंवा ठोक मोर्चा कुणीही पुढाकार घ्यावा मी त्यांच्यासोबत राहीन, पण हा विषय पुढे नेण्यासाठी सामूहीक नेतृत्वाची गरज आहे.

(Radhakrishna Vikhe Patil said that all organizations need to come together for Maratha reservation)

हेही वाचा: लूट करणाऱ्यांना मोकळीक तर दाद मागणाऱ्यांवर गुन्हे - जितेंद्र भावे