esakal | Nashik : आगामी निवडणुकांचे राष्ट्रवादी फुंकणार बिगुल
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

Nashik : आगामी निवडणुकांचे राष्ट्रवादी फुंकणार बिगुल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा परिषद अन पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगूल फुंकणार आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या शुक्रवारपासून (ता. १) तीन दिवसांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सकाळी अकराला येवल्यातील एस. पॅलेसमधील येवला विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्यापासून पाटील यांचा दौरा सुरु होईल. रविवारी (ता. ३) सायंकाळी साडेपाचला नाशिकमधील राष्ट्रवादी भवनातील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठकीने त्यांच्या दौऱ्याची सांगता होईल.

पाटील हे उद्या (ता. १) रात्री साडेआठला नाशिकमध्ये, तर शनिवारी (ता. २) मालेगावमध्ये मुक्काम करतील. श्री. पाटील यांच्या आढावा बैठकींचा कार्यक्रम असा : शुक्रवारी (ता. १)- दुपारी दोन-निफाडमधील शिवनेरी लॉन्स, सायंकाळी साडेचार- सिन्नर येथील नगरपालिका नाट्यमंदिर, सायंकाळी साडेसहा-देवळाली विधानसभा मतदारसंघाची विहितगाव-वडनेर रस्त्यावरील साई ग्रँड लॉन्स. शनिवारी (ता. २)- सकाळी अकराला नाशिकमधील राष्ट्रवादी भवनात इगतपुरी विधानसभा मतदारसंघ, दुपारी पावणेबाराला नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी, दुपारी सव्वादोनला दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवन, सायंकाळी पावणेचारला कळवणमधील हरीओम लॉन्स, सायंकाळी साडेपाचला सटाणामधील राघाई मंगल कार्यालय, सायंकाळी सव्वासातला मालेगावमधील ए. टी. टी. हायस्कूलमध्ये मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ.

रविवारी (ता. ३)- सकाळी दहाला नांदगाव येथील मातोश्री लॉन्स, दुपारी बाराला चांदवड येथील जिल्हा बँक हॉल, दुपारी अडीचला नाशिकमधील राष्ट्रवादी भवनात शहर कार्यकारिणी, दुपारी साडेतीनला नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ, सव्वाचारला नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील बैठकीनंतर श्री. पाटील मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांनी राज्यभरातील प्रश्‍न मार्गी लागावेत म्हणून परिवार संवाद यात्रा कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सुरु केली होती. अशातच, कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर ती ओसरल्यावर संवाद यात्रेचा पुढील टप्पा सुरु केला. आता तिसऱ्या टप्प्यात ते नाशिकच्या दौऱ्यावर येताहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली.

loading image
go to top