

Court Refuses Relief in Rape and Conversion Case; Probe Intensifies
sakal
नाशिक: येथील बहुराष्ट्रीय नामांकित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील संशयित निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. निदा खान या आदेशाविरोधात दाद मागण्याची शक्यता आहे. तर, सत्र न्यायालयाचे न्या. केदार जोशी यांनी गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, निदा खान महिनाभरापासून फरार आहे.