Nashik Crime News : लोकसभा निवडणूक दरम्यान दारु विक्री, वाहतुकीचे 710 गुन्हे

Nashik Crime : अवैधरीत्या मद्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या संशयित यांच्याकडून २ कोटी ४७ लाख ३१ हजार ६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त आला.
Crime
Crimeesakal

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लागू केलेल्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैधरीत्या मद्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या संशयित यांच्याकडून २ कोटी ४७ लाख ३१ हजार ६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त आला. यात एक लाख होऊन अधिक लिटरची अवैध दारू विक्री व वाहतूक करताना पकडण्यात आली असून यासंदर्भात ७१० गुन्हे दाखल करण्यात आले. ( 710 offenses of liquor sales traffic during Lok Sabha election )

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देशात १६ मार्चपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. लोकसभेचा निकाल झाल्यानंतर ही आचारसंहिता संपुष्टात आली. दरम्यानच्या काळात राज्य उत्पादक शुल्क विभागाने नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदार संघात गुप्त माहितीच्या आधारे, खबऱ्यांचे नेटवर्क,अधिकारी-कर्मचारी यांच्या योग्य समन्वयातून अवैधरीत्या दारु विक्री आणि वाहतूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करत सुमारे दोन कोटी ४७ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करत ७१० जणांवर गुन्हे दाखल केले.

यापुढेही अशा स्वरूपाच्या कारवाया नियमित सुरू राहतील, असे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी सांगत जप्त करण्यात आलेला मद्यसाठा आतापर्यंतच्या निवडणूक आचारसंहिता सर्वाधिक मद्याचा साठा असल्याचे सांगितले.

Crime
Nashik Crime News : गोमांसासह टेम्पो जप्त! चालकाला अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनची कामगिरी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान अवैधरीत्या दारू विक्री आणि वाहतूक प्रकरणी एकूण ४३० गुन्हे दाखल झाले होते. ९० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र २०२४ च्या निवडणुकीत जवळपास २०१९ च्या तुलनेत अडीच पट मुद्देमाल पकडण्यात आला आहे.

निवडणूक मद्य जप्त (लि) मुद्देमाल किंमत गुन्हे दाखल

२०१९ ७६,०५७ ९३,९८,६३१ ४३०

२०२४ १,००५३४ २,४७,३१,६१३ ७१०

Crime
Nashik Crime News : आधी मोबाईल चोरला, नंतर युपीआयने आर्थिक फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com