Nashik Crime News : निलंबित ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

Nashik Crime : माळेगाव ग्रामपंचायतीचे निलंबित ग्रामविकास अधिकारी संजय भावसिंग पाटील यांच्याविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Crime
Crime esakal

वावी : बनावट अल्पदृष्टीचे प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेची फसवणूक केली व सोयीने बदली करून घेतल्याप्रकरणी माळेगाव ग्रामपंचायतीचे निलंबित ग्रामविकास अधिकारी संजय भावसिंग पाटील यांच्याविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे. लखमापूर (ता. दिंडोरी) ग्रामपंचायतीत कार्यरत असताना, पाटील यांनी अल्पदृष्टीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून माळेगाव ग्रामपंचायतीत बदली करून घेतली होती. (Nashik Crime against suspended Village Development Officer)

हा प्रकार उघड झाल्यावर पाटील यांना तत्काळ निलंबित केले होते. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सिन्नरच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार पाटील दिंडोरी तालुक्यात असताना घडला होता.

गुन्हा दिंडोरी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी दाखल करावा, असे सांगत प्रशासकीय पातळीवरच टोलवाटोलवी सुरू होती. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सिन्नरच्या गटविकास अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

Crime
Nashik Crime News : ‘एमडी’ ड्रग्जचा लाखांचा साठा जप्त

मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी दिंडोरी व सिन्नर पोलिसांकडूनही चालढकल केली जात होती. याबाबत पोलिस अधीक्षकांची बोलणार असल्याचे सूतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी केले होते.

त्यानंतर सिन्नर पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाचे विस्ताराधिकारी सतीश पगार यांनी फिर्याद दिली. त्यावरून सिन्नर पोलिसांनी संशयित संजय पाटील याच्याविरुद्ध ठकबाजी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Navi Mumbai Crime: पोलिसांनी रचला सापळा अन् अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना केली अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com