Nashik Crime: मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सहकारी महिलेशी जातिवाचक बोलत केले अश्लील वर्तन

Crime News : असे कृत्य केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime Against Women
Crime Against Womenesakal

नाशिक रोड : मुद्रांक नोंदणी कार्यालयातील खासगी ऑपरेटर महिलेशी जातिवाचक बोलून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Indecent behavior with female colleague marathi news)

नाशिक रोड येथील पीडित महिलेने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की १ ऑक्टोबर २०२० ला दुय्यम निबंधक कार्यालय, वर्ग दोन येथे खासगी ऑपरेटर म्हणून रुजू झाली. त्यानंतर दुय्यम निबंधक प्रवीण चौधरी यांनी तिच्याशी अश्लील भाषेत बोलून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

सुटीच्या दिवशी कार्यालयात बोलावून शरीरसुखाची मागणी केली. नोकरीची गरज असल्याने काही दिवस शांत राहिले. त्यानंतर तिने एस. टू. इंफोटेक कंपनीचे इंजिनिअर देवीदास कोल्हे यांना हा प्रकार सांगितला असता, त्यांनी नोकरीत तडजोड करावी लागते, असे सांगून नाशिकच्या बाहेर एकटे भेटण्यास सांगितले.

Crime Against Women
Crime News: आंबे चोरण्याचा संशयातून महिलेवर गोळी झाडत केला हल्ला

त्यानंतर तिची सहाय्यक निबंधक कार्यालयात बदली झाल्यानंतर सहाय्यक जिल्हा निबंधक कैलास दवंगे यांनी देखील पीडित महिलेजवळ शरीरसुखाची मागणी केली. २०२३ मध्ये पीडित महिलेची सिन्नर कार्यालयात बदली झाल्यानंतर लिपिक असलेले प्रभारी अजय पवार यांनी त्या महिलेला चौधरी व कोल्हेसाहेबांनी बोलावले आहे, असे सांगितले.

त्यानंतर सिन्नर कार्यालयातील दुय्यम निबंधक सागर बच्छाव यांनी देखील जानेवारी २०२४ मध्ये पीडित महिलेशी गैरवर्तन करून जातिवाचक उद्धार केला. साहेबांचे नाव घेऊ नको, पैसे देतील, तडजोड करून घे, असे आमिष दाखविले. उपनगर पोलिस ठाण्यात सहजिल्हा निबंधकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात महसूल विभागात खळबळ माजली असून, पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

Crime Against Women
Nagpur Crime: कारागृहातून सुटले, घरफोडी करायला लागले...दोघांना अटक ; सहा गुन्ह्यांचा उलगडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com