Nashik Crime News : रेकॉर्डवरील 158 गुन्हेगारांची ‘चेकिंग’

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील परिमंडळ दोन अंतर्गत पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. २६) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
Crime
Crime esakal

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील परिमंडळ दोन अंतर्गत पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. २६) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. दरम्यान शहर-जिल्ह्यातून तडीपार व रेकॉर्डवरील १५८ गुन्हेगारांची चेकिंग केली तर, ऑपरेशनदरम्यान दोघे तडीपार शहरात आल्याचे निष्पन्न झाले. (Checking of 158 criminals on record)

त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनमध्ये शुक्रवारी रात्री ऑपरेशन राबविण्यात आले. नाशिक रोडसह उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड, सातपूर आणि चुंचाळे चौकी परिसरात सदर मोहीम राबवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच, रेकॉर्डवरील १५८ गुन्हेगारांची चेकिंग करण्यात आली. ऑपरेशनमध्ये उपनगर ठाण्याच्या हद्दीतून तडीपार गुंड विकी विलास शिराळ (ता. विहीतगाव) यास २० हजारांच्या गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

Crime
Mumbai Crime : मिरा रोड येथे तरुणीवर लैंगिक अत्याचार; वाचा नक्की काय घडलं!

तसेच, सुशिल देविदास कांबळे (रा. बागूलनगर) यास कोयत्यासह अटक केली. दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे, अंबड ठाण्याच्या हद्दीतूनही सराईत गुन्हेगार गणेश विष्णू कुऱ्हाडे (रा. शिवाजी चौक) यास तलवारीसह अटक केली असून, त्यालाही शहर-जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही तो शहरात आढळून आला.

तसेच, नाशिक रोड हद्दीमध्ये महेश माणिकराव पकडे यास देशी दारूच्या ७०० रुपयांच्या साठ्यासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Crime News: अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई; ११ आफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com