Nashik Crime : धक्कादायक! मुखेड आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा संस्थाचालकाकडून विनयभंग; गुन्हा दाखल

Crime News : मुखेड (ता. निफाड) येथील सुरूची आश्रमशाळेत संस्थाचालकाने मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Crime against girl
Crime against girlesakal

पिंपळगाव बसवंत : मुखेड (ता. निफाड) येथील सुरूची आश्रमशाळेत संस्थाचालकाने मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यात संस्थाचालकाविरोधात विनयभंग व पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष दिनेश चौधरी, असे संशयित संस्थाचालकाचे नाव आहे. (Nashik Crime Girl molested by headmaster Mukhed Ashram School marathi news)

मुखेडच्या आश्रमशाळेत मागील वर्षी इयत्ता अकरावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या वसतिगृहात सुभाष चौधरी गेला. मुलीचे कपाट तपासणीचा बहाणा करू लागला. काही मुलींशी लज्जास्पद वर्तन केले, तर एका विद्यार्थिनीच्या विनयभंग केला. ‘रात्री नऊला माझ्या खोली दोनमध्ये ये’, ‘आपण गप्पागोष्टी करू’, असे त्या मुलीला सांगितले.

याबाबत कुणाला काही सांगितले, तर शाळेतून काढून टाकण्याची धमकी चौधरीने संबंधित विद्यार्थिनीला दिली. हा प्रकार पीडित विद्यार्थिनीने प्राचार्य चंद्रकांत आहेर, मुख्याध्यापक नंदकुमार पगार, अधीक्षिका पाटील, शिक्षिका वाघ, जाधव यांच्यापुढे कथन केला. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Crime against girl
Nagpur Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! मोठ्या भावाने हातोडीने केला लहान भावाच्या डोक्यावर वार, जखमी रुग्णालयात दाखल

संशयित चौधरीला अद्याप पिंपळगाव पोलिस अटक करू शकलेले नाहीत. संशयित चौधरी याच्याविरोधात अजून काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाराशरी शिक्षण संस्थेची आश्रमशाळा चौधरी याने पाच वर्षांसाठी कराराने चालविण्यासाठी घेतली आहे. मुखेड येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले, पण पिंपळगावचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केली.

Crime against girl
Crime News: २५ मानवी कवट्या, शेकडो हाडं अन् हाडांपासून बनवलेली खुर्ची, पलंग... फार्म हाऊसवर मिळाल्या भयानक गोष्टी! पोलीसही हैराण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com