Nashik Crime: ‘एक्साईज’ची नाकाबंदी तोडून अवैध मद्याचा ट्रक नाशिकमध्ये! शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाची कारवाई

Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी होण्याची शक्यता गृहित धरून शहर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे.
Police & Liquor
Police & Liquoresakal

Nashik Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी होण्याची शक्यता गृहित धरून शहर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. त्यामुळेच, जिल्ह्याभोवती असलेल्या एक्साईज विभागाची नाकाबंदी तोडून गुजरातमधून विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक शहरात येताच शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून पकडला. आयशर ट्रक व पावणे दोन लाखांचे विदेशी मद्यसाठा असा सुमारे पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (Nashik Crime Illegal liquor truck broke blockade of Excise in city marathi news)

सुनील नटवर राणा (४५, रा. मीनाक्षी डेअरीजवळ, पादरा, जि. बडोदा, गुजरात), चंद्रेश भीकाभाई पटेल (३२, रा. चिप्पाड तलाव झोपडपट्टी, पादरा, जि. बडोदा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हेशाखेचे अंमलदार शंकर काळे यांना परराज्यातून येणाऱ्या ट्रकमध्ये विदेशी मद्याचा साठा असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडच्या भीमनगर परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानुसार संशयित आयशर ट्रक (जीजे ०६ एटी ६४७३) आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने ट्रकला रोखले.

ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी मद्य व बिअर असा १ लाख ७७ हजार ३६० मद्याचा साठा पोलिसांच्या हाती लागला. ७ लाखांचा आयशर ट्रक व मद्यसाठा असा ८ लाख ७७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक निरीक्षक सचिन जाधव, शंकर काळे, विलास गांगुर्डे, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, परमेश्वर दराडे, संजय पोटिंदे, मधुकर साबळे यांनी बजावली.  (latest marathi news)

Police & Liquor
Beed Crime News : दुप्पट परताव्‍याचे आमिष दाखवत ३३ लाखांची केली फसवणूक

एक्साईज नाकाबंदी कुचकामी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून मद्याची तस्करी होण्याची शक्यता गृहित धरून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क, पोलिस यंत्रणा यांना नाकाबंदी करीत कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी सुरू केली आहे.

असे असतानाही लाखोंचा मद्यसाठ्यासह आयशर ट्रक गुजरातमधून थेट नाशिक शहरात दाखल झाल्याने एक्साईजची नाकाबंदी कुचकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे मद्यसाठ्यासह ट्रक नाशिकमध्ये पोहोचेपर्यंत एक्साईज विभागाच्या एकाही पथकाला या ट्रकची खबरही लागू नये, याचेही आश्चर्य व्यक्त होते आहे.

Police & Liquor
Crime News: मोबाईवरून झालल्या भांडणात महिलेचा मृत्यू; पोलिसांनी घेतले दिराला ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com