Vaibhav Deore Extortion Case : पैसे न दिल्याने आणल्या गाड्या ओढून; अवैध सावकारीचा गुन्हे दाखल

Deore Extortion Case : खंडणीखोर वैभव देवरे याचे नवनवीन कारनामे उघड होऊ लागले आहेत.
Vaibhav Deore
Vaibhav Deore esakal

नाशिक : खंडणीखोर वैभव देवरे याचे नवनवीन कारनामे उघड होऊ लागले आहेत. अवैधरित्या सावकारी करणार्या देवरे याला पैसे न दिल्यास त्याने एका महिलेच्या दोन कार जबरदस्तीने घेऊन आला. तसेच, महिलेला अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंगही केला. तर दुसर्या एका प्रकारात दिलेल्या पैशांची अव्वाच्या सव्वा व्याजाने वसुल केल्याप्रकरणी अवैध सावकारीचा गुन्हाही देवरेविरोधात दाखल करण्यात आला आहे. (nashik crime Illegal money lender crime registered against Vaibhav Deore )

गेल्या आठवड्यामध्ये खंडणीखोर वैभव देवरे याच्याविरोधात १२ लाखांच्या खंडणीचा गुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर शहर गुन्हेशाखेकडे सातत्याने त्याच्याविरोधात तक्रारी येत आहेत. अल्पावधीमध्ये व्याजाच्या पैशातून देवरे याने गडगंज माया जमविली आहे. देवरे याच्याविरोधात इंदिरानगर पोलिसात जबरी चोरी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित महिलेने देवरे याच्याकडून तीन लाख रुपये १० टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. त्या रकमेच्या व्याजाची रक्कम महिलेने फेडलीदेखील होती. तरीही देवरे पीडित महिलेकडे पैशांची मागणी करीत होता. याचसंदर्भात संशयित देवरे याने पीडित महिलेचे घर गाठले आणि त्यांच्या दोन चारचाकी वाहने जबरदस्तीने घेऊन आला.

Vaibhav Deore
Vaibhav Deore Extortion Case: खंडणीखोर देवरेकडे गडगंज मालमत्ता! शहर-जिल्ह्यातील अनेकांकडून उकळली व्याजाच्या नावाखाली खंडणी

तसेच पीडितेला अश्लिल शिवीगाळ करीत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, देवरे याच्याविरोधात जबरी चोरीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास महिला उपनिरीक्षक बारेला या करीत आहेत.

४ लाखांचे २८ लाख घेतले

खंडणीखोर वैभव देवरे याची अवैध सावकारी लपून राहिलेली नव्हती. भाजपाच्या राजकीय पदाधिकार्याला तब्बल ३ कोटींना गंडविल्यानंतरही त्याच्याविरोधात त्यांनी तक्रार दिली नव्हती. मात्र खानकारी यांच्या तक्रारीनंतर आता अनेकजण तक्रारीसाठी पुढे येत आहेत.

नवीन सोनवणे (रा. इंदिरानगर) यांनीही देवरेकडून व्याजाने ४ लाख घेतले असता, व्याजासाठी देवरे याने शिवीगाळ करीत सोनवणे यांच्या वडलांच्या बँक खात्यावरील पेन्शनचे ९ लाख रुपये बळजबरीने घेतले. तसेच वारंवार धमकावून व्याजापोटी २८ लाख वसुल केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक फुंदे हे तपास करीत आहेत.

Vaibhav Deore
Vaibhav Deore Extortion Case : खंडणीखोर देवरेविरोधात आणखी 2 गुन्हे; पोलिस कोठडीत 5 दिवस वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com