Nashik Crime News : ट्रक टर्मिनल येथून ट्रक चोरीला! 2 दिवसात चोरीच्या घटनांत वाढ

Crime News : मुंबई - आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनल्स येथे पार्क केलेला ४ लाखांचा ट्रकच चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला आहे.
crime
crimeesakal

नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनल्स येथे पार्क केलेला ४ लाखांचा ट्रकच चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला आहे. याचप्रमाणे शहरात चोरीच्या घटनाही घडल्या असून, दुकानाचे पत्रे उकटून साहित्य चोरीला गेले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (nashik crime Increase in theft incidents in city marathi news)

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनल येथे पार्क केलेला ४ लाखांचा ट्रक (एमएच ४१ जी ९२६२) अज्ञात चोरट्याने चोरून नेला. पितांबर विठ्ठल सोनवणे (रा. बालाजीनगर, कोणार्कनगर, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, २६ तारखेला मध्यरात्री सदरील ट्रक चोरीला गेला. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरावाडीतील कमलनगर येथे दाराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून दोन लॅपटॉप व मोबाईल असा २५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गोविंदा चव्हाण (रा. कमलनगर, हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Nashik Crime News : कोटबेलला कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

तपोवनात असलेल्या श्रीराम मोटर्स या दुकानाचे मागील पत्रे उचकटून चोरट्यांनी ५० हजार ८०० रुपयांचे प्लंबिंग मटेरिअर व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. संकेत नरेंद्र चांडक (रा. गोदावरी निवास, घोटी) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सदरील घरफोडी केली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिटी सेंटर मॉलच्या मागे असलेल्या मधुरा पार्क येथी पार्किंगमध्ये असलेले हार्डवेअरचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला. डॉ. धर्माजी जयराम बोडके (रा. मधुरा पार्क, उंडवाडी पुलाजवळ, तिडकेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, १५ ते २२ तारखेदरम्यान सदरील प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Nashik Crime News : मद्यधुंद पोलिसाचा अधीक्षक कार्यालयात गोंधळ; आडगाव पोलिसात गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com