Nashik Crime News : शहरात वाहनचोरट्यांचा सुळसुळाट! आयुक्तालय हद्दीतून 5 दुचाक्या लंपास

Crime News : पंचवटी, आडगाव, गंगापूर आणि इंदिरानगर परिसरातून पाच दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत
Crime News
Crime Newsesakal

नाशिक : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये पुन्हा दुचाक्या चोऱ्या वाढल्या आहेत. पंचवटी, आडगाव, गंगापूर आणि इंदिरानगर परिसरातून पाच दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ()Nashik Crime 5 two wheeler stolen from Commissionerate limits news)

संजय राधाकृष्ण पवार (रा. पिंगळे नगर, पेठरोड) यांची १५ हजारांची दुचाकी (एमएच १५ बीवाय ८०२७) २९ मार्च रोजी मार्केट यार्डजवळील सिद्धकला प्रिटींग प्रेससमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत गोपाळराव शिंदे (रा. मोहाडी, ता. दिंडोरी) यांची १० हजारांची दुचाकी (एमएच १५ बीएल ८०८४) २६ मार्च ोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या दरम्यान आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजनारायण बटुकदेव (रा. पारिजातनगर, नाशिक) यांची ३५ हजारांची पल्सर दुचाकी (एमएच १५ जेजी ८२०३) २८ मार्च रोजी पारिजातनगर येथील सायकल सर्कलजवळ पार्किंगमध्ये पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Crime News
Pune Crime News : कोयता हवेत फिरवत तरुणाची ‘स्टंटबाजी’ ; सुभाषनगरमधील घटना, स्थानिक रहिवाशांकडून संताप

तर इंदिरानगर परिसरातून दोन दुचाक्या चोरीला गेल्या असून, बबन निवृत्ती वर्पे (रा. पांडवनगरी, इंदिरानगर) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ एचएस ४५७२) गेल्या १५ मार्च रोजी मध्यात्री राहत्या द्रोणाचार्य इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

तर, मनिष सुभाष पवार (रा. चार्वाक चौक, इंदिरानगर) यांची ३० हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ एपी ६८६७) २० मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास स्टेट बँक कॉलनीतील स्वामी बंगल्यासमोर पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Crime News
Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com