Nashik Crime News : लखाणेत एकाच रात्री 3 घरफोड्या; लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : लखाणेत एकाच रात्री 3 घरफोड्या; लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

झोडगे : लखाणे (ता. मालेगाव) येथे एकाच रात्री तीन घरफोड्यांमुळे गाव- परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

डॉ. कैलास त्र्यंबक इंगळे यांच्या घरी रात्री अडीचच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या वेळी गोदरेज कपाटातील अडीच तोळे सोने व सुमारे ६५ हजार रुपये रोख रक्कम, राजेंद्र मन्साराम इंगळे यांच्या घरातून एक तोळे सोने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम, रेखाबाई पवार यांच्या घरातून २५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. डॉ. कैलास इंगळे, राजेंद्र इंगळे कुटुंबासह विवाह समारंभासाठी शनिवारी (ता. १७) मालेगावला गेले होते. तर रेखाबाई पवार पाचोरा येथे गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून हात साफ केला.

हेही वाचा: Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? उद्यान असून नसल्यासारखे झाल्याने नागरिक त्रस्त

चोरटे रात्री इंडिका कारने अस्ताने, झोडगे मार्गाने पसार झाल्याचे प्रथमदर्शी राकेश इंगळे व सिताराम शेवाळे यांनी सांगितले. लखाणेसारख्या लहान गावात प्रथमच चोरी झाल्याने ग्रामीण भागात सुरक्षिततचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पोलिसपाटील नितीन इंगळे यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा तत्काळ शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: Nashik Airport : ओझरला भविष्यात दुसरा स्वतंत्र रनवे

टॅग्स :NashikCrime News