Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? उद्यान असून नसल्यासारखे झाल्याने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik News : आम्ही खेळायचं कुठं? उद्यान असून नसल्यासारखे झाल्याने नागरिक त्रस्त

सिडको : येथील सुंदरबन कॉलनीत असलेल्या सुंदरबन उद्यानाचे फक्त नावाच सुंदरबन आहे. उद्यानाची स्थिती मात्र, समस्यांचे आगार झालेली दिसून येते. या उद्यानाचा वापर कोणासही करता येत नसल्याचे वास्तववादी चित्र आहे. नाशिक महानगरपालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करून उद्यान बनवते. उद्यान बनविल्यानंतर मात्र देखभाल होत नसल्याने ते नागरिकांच्या निरुपयोगी ठरते.

हेही वाचा: Nashik News : अपुऱ्या बससेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची परवड

निरुपयोगी ठरणाऱ्या उद्यानांमुळे नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा उद्यानांमुळे नागरिक त्रस्त तर उद्यानविभाग सुस्त असे चित्र आहे. सुंदरबन कॉलनीतील उद्यानात मोठ्या प्रमाणावर गाजर गवत वाढलेले असून खेळण्या देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत. फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर कचरा व गाजर गवत वाढलेले असून सुरक्षा कुंपण तुटलेले आहे. तर कचरा पडलेला आहे. सुंदरबन कॉलनीतील रहिवाशांना उद्यान असून नसल्यासारखे आहे. परिसरातील नागरिकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या उद्यानांमध्ये घेऊन जावे लागत असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

सुंदरबन उद्यान, सिडको

उद्यान असूनही नागरिकांसाठी निरुपयोगी

दुसऱ्या उद्यानांचा चिमुकल्यांना सहारा

खेळणी तुटलेल्या अवस्थेत

गाजर गवत वाढलेले

उद्यानात सर्वत्र कचरा

सुरक्षा कुंपण तुटलेले

हेही वाचा: Nashik News : त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिक्रमणांची डोकेदुखी; गल्ल्या अरुंद अन् पादचारी मार्ग झालेत बंद!

''उद्यानाचा वापर स्थानिक रहिवाशांसाठी उरलेलाच नाही. याठिकाणी वाढलेल्या गाजर गवतात विषारी प्राण्यांचा वावर असल्याने मनपा प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करायला हवी.'' -संगीता बर्वे, गृहिणी

''नाशिक महानगर पालिका प्रशासन अनेक ठिकाणी नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करून उद्यान बनवते. मात्र, मनपा कर्मचारी, अधिकारी देखभाल करीत नाही. यात नागरिकांचाच पैसा वाया जात असून ही उद्याने दुरुस्तीसाठी येणारा खर्च कर्मचाऱ्यांकडून घ्यावा.'' - वंदना कांबळे, गृहिणी

हेही वाचा: Nashik Politics : ''...तर आमच्या निर्णयाची सत्यात कळेल''; अजय बोरस्ते यांचा शिवसेना नेत्यांवर पलटवार

''उद्यान कमी आणि खंडर जास्त वाटणारे हे उद्यान असून याचा काहीच उपयोग राहिलेला नाही. अनेक वर्षापासून येथील स्वच्छता करण्यात आलेली नाही. येथे असणाऱ्या फुटपाथ वर देखील गवत वाढलेले आहे. उद्यानाची देखभाल व दुरुस्ती करून हे उद्यान सुरु व्हायला हवे.'' -संगीता विखणकर, गृहिणी

''उद्यानात खेळणी तुटलेल्या असून लहान मुलांना उद्यानाचा काहीच फायदा होत नाही. तर आमच्या मुलांना इतर उद्यानात घेऊन जाण्याची नामुष्की आली आहे.'' -कविता देवरे, गृहिणी

''उद्यान अनेक महिन्यांपासून समस्यांच्या गर्तेत असून, रात्रीच्या सुमारास येथे मद्यपींचा वावर असतो. उद्यानाबाबत अनेकदा उद्यान विभागास परिसरातील नागरिकांनी तक्रारी केलेल्या असूनही येथे काहीही उपाययोजना होत नाही.'' - सुषमा जाधव, गृहिण

टॅग्स :NashikGarden