
Nashik Crime News: विवाहितेला गुंगीच्या गोळ्या देत अत्याचार
नाशिक : ओळखीतून निर्माण झालेल्या प्रेमसंबंधाचा फायदा घेत संशयिताने विवाहित नर्सला गुंगींच्या गोळ्या खाण्यास देऊन लैंगिक अत्याचार केले. यानंतर पीडितेचे अश्लील फोटो काढून घेत लग्नास नकार मिळताच फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना मुंबई नाका परिसरात घडली.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित प्रियकराला अटक केली आहे. मनोज यशवंत जगताप (२७, रा. सावतानगर, त्रिमूर्ती चौक, सिडको), असे संशयित प्रियकराचे नाव आहे. घटनेतील पीडिता व संशयित खासगी हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. २४ वर्षांची पीडित विवाहिता असून, तिला दोन मुले आहेत. ती रुग्णालयात नर्स आहे. ६ सप्टेंबर २०२२ पासून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले.
दरम्यान, मनोजच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने त्याने या नर्सला सेलिब्रेशनसाठी तयार केले. त्यानंतर त्याने तिला मुंबई नाका हद्दीतील शिवाजीवाडी ते इंदिरानगर अंडरपास मार्गे गाडीवर बसविले. त्यानंतर तिला गुंगीच्या गोळ्या खाण्यास दिल्या. तिला गुंगी आल्याने त्याने तिला सावतानगर येथील घरी नेले.
तेथे गुंगीच्या नशेत असताना त्याने लैंगिक अत्याचार करून अश्लील फोटो काढले. त्यानंतर त्याने तिला लग्नाची अट घातली. मात्र, तिने लग्नास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने अश्लील सोशल मीडियावर व्हायरल केले.