Nashik Crime News : खंडणी वसुली प्रकरणी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : खंडणी वसुली प्रकरणी एकाला अटक

सातपूर : नगरसेविका पुत्र विक्रम नागरे यांच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी मुख्य संशयित रोशन काकड सह अन्य संशयितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली खरी, पण अटकपूर्व जामीन न मिळाल्याने अखेर रोशन काकड सातपूर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. दीपक भास्कर भालेराव, रोशन हरदास काकड, संजय जाधव, गणेश अशोक लहाने, गौरव ऊर्फ गुलब्या घुगे, अनिरुद्ध शिंदे, जया दिवे आदींनी ठेकेदार विक्रम नागरे यांच्या घरावर दगडफेक केली होती.

हेही वाचा: Nashik News : ZP ला संगणक खरेदीत 12 लाखांचा फटका?

१ जानेवारी २०२० ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संशयित दीपक भालेराव व रोशन काकड यांनी नागरे यांना त्यांच्या शेताच्या रस्त्यावर अडवून जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी त्यांच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार नागरे यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी संजय जाधव व अनिरुद्ध शिंदे व अरुण गायकवाड यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर काकड, भालेराव, दिवे, लहाने, घुगेसह इतर फरार होते. दोन दिवसांपूर्वी गौरव घुगे, गणेश लहाने यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील रोशन काकड हा मुख्य संशयीताने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा: Sand Smuggling : अरेच्चा! अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी चक्क रस्त्यात खोदले खड्डे

न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्याने सकाळी सातपूर पोलिसांनी त्याला ताब्यात आले आहे. या प्रकरणी एकूण 19 पेक्षा जास्त संशयित आहे. लवकरच सर्व संशयित ताब्यात येतील, असे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :NashikcrimeArrest