Nashik Crime News : रिक्षातून देशी दारुची तस्करी! दोघांना अटक; गुन्हेशाखेची कारवाई

Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आयुक्तालय हद्दीमध्ये कसून गस्त सुरू आहे.
Country Liquor stock and suspect seized from Deolali camp area along with rickshaw. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Country Liquor stock and suspect seized from Deolali camp area along with rickshaw. A team from Unit Two of the City Crime Branch along withesakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आयुक्तालय हद्दीमध्ये कसून गस्त सुरू आहे. मद्याची तस्करी होण्याची शक्यता गृहित धरून शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाच्या गस्ती पथकाने रिक्षातून तस्करी होणाऱ्या देशी दारुचा साठा जप्त केला आहे. (Nashik Crime Smuggling of deshi liquor by rickshaw marathi news)

निवडणूक काळात मद्याची अवैधरित्या तस्करी होण्याची शक्यता असल्याने शहर पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असून, वाहनांची कसून तपासणीही केली जात आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार गुलाब सोनार हे गस्तीवर असताना देवळाली कॅम्प परिसरात रिक्षातून अवैध देशीदारुची तस्करीची खबर मिळाली होती.

त्यानुसार पथकाने गवळीवाड्यातील सिंधी पंचायत हॉल परिसरात सापळा रचला होता. संशयित रिक्षा (एमएच १५ एफयु ४६९०) आली असता, दबा धरून असलेल्या पथकाने रिक्षा रोखली. रिक्षाची तपासणी केली असता, रिक्षात ४ हजार ५६० रुपयांचा देशीदारुचा साठा जप्त करण्यात आला. (latest marathi news)

Country Liquor stock and suspect seized from Deolali camp area along with rickshaw. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Pune Crime News : कोयता हवेत फिरवत तरुणाची ‘स्टंटबाजी’ ; सुभाषनगरमधील घटना, स्थानिक रहिवाशांकडून संताप

रिक्षासह साठा असा १ लाख ४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच, संशयित मनोज प्रल्हाद पवार (३९, रा. स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प), सलीम अकबर खान (३२, रा. पंचशिलनगर, खडकाळी, भद्रकाली) यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, गुलाब सोनार, नितीन फुलमाळी, संजय पोटिंदे, सुरेश तुपे, रमाकांत सिद्धपुरे यांनी बजावली.

Country Liquor stock and suspect seized from Deolali camp area along with rickshaw. A team from Unit Two of the City Crime Branch along with
Nagpur Crime: मैत्रिणिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com