Nashik Crime News : शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट! उपनगरीय परिसरातून 5 दुचाक्या लंपास

Crime News : शहर परिसरात दुचाक्या चोरीला जाण्याचे प्रमाण सातत्याने सुरूच आहे.
Bike Theft
Bike Theftesakal

Nashik Crime News : शहर परिसरात दुचाक्या चोरीला जाण्याचे प्रमाण सातत्याने सुरूच आहे. उपनगरीय परिसरातून पुन्हा पाच दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्या असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nashik Crime Two wheeler thieves in city news)

रवीन आबा सैंदाणे (रा. शिंदे वस्ती, आडगाव) यांची १५ हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ सीएन ०१५२) पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम समोरील पुलावरून चोरीला गेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल हिरामण पाटील (रा. स्वानंदी प्राईड अपार्टमेंट, रामनाथ नगर, आडगाव) यांची ३५ हजारांची दुचाकी (एमएच १५ जीटी ०६३९) शनिवारी (ता. १३) मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली धर्मेंद्र चौधरी (रा. शिवाजीनगर) यांची १५ हजारांची प्लेझर मोपेड (एमएच १५ सीई ९५२३) शुक्रवारी (ता. १२) मधयरात्री जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (latest marathi news)

Bike Theft
Nashik Crime News: 30 लाखांचे वन्यजीवांचे अवयव जप्त! गुप्तचर संचालनालय, वनविभागाची संयुक्त कारवाई; एकास अटक

ज्ञानेश्वर पुंडलिक जाधव (रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) यांची १५ हजारांची दुचाकी (एमएच १५ एफवाय ९५८६) राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून १० तारखेला चोरीला गेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन तुळशीराम सभादिंडे (रा. दीपरेखा अपार्टमेंट, गोविंदनगर) यांची ६५ हजारांची दुचाकी (एमएच ३७ एएफ ५३०७) गुरुवारी (ता. ११) सायंकाळी साडेसात वाजता राजीवनगरमधील चड्डापार्क बिल्डिंगसमोरून चोरीला गेली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bike Theft
Crime News: दुकानांच्या तोडफोडप्रकरणी २५ ते ३० जणांवर गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com