Nashik Crime News : सांजेगाव येथील पहिलवान युवकाची गोळ्या घालून हत्या!

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील भूषण दिनकर लहामगे ( वय ४२ ) या पहिलवान युवकाची अज्ञात मारेकऱ्यांनी भर दुपारी महामार्गावर कोयत्याने वार करून व गोळ्या घालून हत्या केली आहे.
Crime
Crimeesakal

वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील भूषण दिनकर लहामगे ( वय ४२ ) या पहिलवान युवकाची अज्ञात मारेकऱ्यांनी भर दुपारी महामार्गावर कोयत्याने वार करून व गोळ्या घालून हत्या केली आहे. राजूर बहुला शिवारातील ढाब्याजवळ हा प्रकार घडला.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. (wrestler youth from Sanjegaon shot and killed)

भूषण हा रोजच्या प्रमाणे जनावरांसाठी खाद्य घेऊन नाशिक कडून वाडिवऱ्हेच्या दिशेने येत असताना महामार्गावरील राजूर बहुला शिवारातील सरबजीत ढाब्याजवळ महामार्गावर पाठीमागून पाठलाग करीत येत असलेल्या मारेकऱ्यांनी भूषण यास थांबवत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरवात केली.

अचानक झालेल्या हल्ल्याने भूषण याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यास गोळ्या घालून ठार केले व तेथून त्यांनी पलायन केले. हत्या ही पूर्व वैमनस्यातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. महामार्गावर आणि भर दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेनंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ धाव घेतली.

या हत्येचे मुळ कारण तपासून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी घटनास्थळाला भेट देत परिसरातील सीसीटिव्ही तपासण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. (latest marathi news)

Crime
Nashik NMC News : बंदोबस्तात धोकादायक इमारती, वाडे उतरविणार; महापालिका आयुक्तांच्या सूचना

पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे पोलिस नाईक प्रवीण काकड, धोंडगे, कचरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक देखील समांतर तपास करीत आहे .घटनेचा प्रकार घडताच नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनेचा तपास करत आहे.

भूषण लहामगे पार्श्वभूमी

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील रहिवासी असलेला भूषण दिनकर लहामगे ( वय ४२ ) हा दोन भाऊ,आई वडील, पत्नी व चार मुलींसह राहत होता. लहानपणापासून कुस्तीचे वेड असल्याने त्याने महराष्ट्रातील अनेक कुस्ती स्पर्धा मध्ये सहभाग घेत बक्षिसे जिंकली आहेत.६५ किलो वजनी गटात त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील प्रतिनिधित्व केले आहे. दहा ते बारा वर्षांपासून त्याने कुस्ती सोडून शेती आणि दुग्ध व्यवसाय करत होता अचानक झालेल्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Crime
Nashik News : बीज परिक्षण औजार पूजनाने आखाती गौराई; सुरगाणा -डांग सीमावर्ती आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने सण साजरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com