Nashik: पीक पाहणीस विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री पीक विमा योजन

नाशिक : पीक पाहणीस विमा कंपनीचे प्रतिनिधी फिरकलेच नाही

वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यात अतिपावसामुळे व पांढराटाका रोगामुळे सलग दोन वर्ष भाताचे ५० ते ६० टक्के नुकसान होऊनही गेल्यावर्षी मोजक्या गावातील २ ते ५ शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली. ९५ टक्के शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. चालू वर्षी भरपाईबाबत विमा कंपनी काहीही बोलायला तयार नाही. एरव्ही मतांसाठी नागरिकांना दंडवत घालणारे नेते आता कुठे गेले असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.

इगतपुरी तालुक्यात भात हे मुख्य पीक घेतले जाते. या पिकावरच वर्षाचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मागील व चालू वर्षी परतीच्या पावसाने ऐन भात सोगणीवेळी थैमान घातले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पाच वर्षापासून पाऊस अनियमित पडतो. गरज आसते त्यावेळेस दडी मारतो, गरज नसते त्यावेळेस धो धो पडतो, तयार झालेल्या पिकाचे नुकसान करतो. नेहमी होणाऱ्या नुकसानीला आधार मिळावा म्हणून शेकऱ्यांनी पीक कर्ज वाढवून भारत एक्सा या विमा कंपनीकडून पीक विमा घेतला. कंपनीने विमा घेतला तेव्हा कोणतेही मार्गदर्शन सूचना केल्या नाहीत, इगतपुरी तालुक्यातील ७५ टक्के शेतकरी संगणक साक्षर नाहीत, त्यामुळे व विमा कंपनीने माहिती न दिल्यामुळे मुदतीत दावा दाखल केला नाही.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

विमा कंपनीचा प्रतिसाद नाही

विमा कंपनीने दिललेल्या टोल फ्री नंबरवर तक्रार केली. इ- मेलवर नुकसान झालेल्या पिकांचे फोटो पाठवले.त्यावर विमा कंपनीने आमची माणसे येतील, ते नुकसानीची पाहणी करतील, परंतु कोणीही आले नाही. शेवटी पीक किती दिवस शेतात ठेवणार, शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला, तक्रारी दाखल केल्या, परंतु विमा कंपनीने दाद दिली नाही. मागचा आनुभव लक्षात घेता भरपाई मिळत नाही म्हणून ५० टक्के शेतकऱ्यांनीच विमा घेतला, त्यांनाही आद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. सलग दोन वर्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विमा भरपाई मिळावी अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.

loading image
go to top