Nashik Cyber Crime : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक पडली महागात! ऑनलाईन भामट्यांनी लावला 65 लाखांना चुना

Crime News : ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक झालेली असताना, अजूनही अशा आमिषांना बळी पडून सुशिक्षितांना गंडा घातला जातो आहे.
Cyber Fraud
Cyber Fraudesakal

Nashik Cyber Crime : ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक झालेली असताना, अजूनही अशा आमिषांना बळी पडून सुशिक्षितांना गंडा घातला जातो आहे. शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापकांसह चौघांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ६५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Cyber ​​Crime Investing in share trading 65 lakhs robbed by online scammers marathi news)

६१ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत गोविंद वाघ (रा. सप्तशृंगी कॉलनी, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना ११ जानेवारी रोजी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर अज्ञात सायबर भामट्याने संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत विचारणा केली. तसेच त्यांच्या शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिषही दाखविले.

वाघ यांनी प्रतिसाद न दिल्यानंतरही संशयित सायबर भामट्यांनी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगसंदर्भात माहिती पाठविली, तसेच वारंवार संपर्क साधून त्यांच विश्वास संपादन केला. यामुळे वाघ यांनी सुमारे १८ लाख रुपये संशयितांच्या शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविले.

याचदरम्यान, संशयित सायबर भामट्यांनी शहरातील आणखी तिघांना संपर्क साधून शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले आणि त्यांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. या आमिषाला भुलून या तिघांनीही पैसे गुंतविले. त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा परतावा त्यांना दिसत होता परंतु त्यांच्या खात्यावर जमा होत नव्हता. (latest marathi news)

Cyber Fraud
Cyber Crime : सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक ‘सायबर लॅब’

याबाबत गुंतवणूक केलेल्या चौघांनी संशयितांकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्कही झाला नाही. त्यावेळी संशयितांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. त्यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. संशयितांनी चौघांची तब्बल ६५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

"ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणार मोठी टोळी आहे. अशा प्रलोभने, आमिषांना बळी पडू नये. अज्ञातांशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहारही करू नये."

- रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.

Cyber Fraud
Cyber Crime : वाघोलीकरांना २५ दिवसात सायबर चोरट्यांनी घातला ८८ लाखांना गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com