नाशिक: बँक खात्यातील बेहिशोबी रक्कम आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचे सांगत, सायबर भामट्यांनी व्हिडिओ कॉल करीत तिघांना डिजिटल अरेस्ट केल्याचे भासविले आणि त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दीड-दोन वर्षातील शहरात डिजिटल अरेस्टची नववी घटना घडली आहे.